मुंबई, 3 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) मुंबई इंडियन्सचा (MI) मार्ग आणखी खडतर झाला आहे. शनिवारी शारजाहमध्ये झालेल्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सनं (Mumbai Indians vs Delhi Capitals) 4 विकेट्सनं पराभव केला. या पराभवानंतर मुंबईची पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आता टीमचे 12 मॅचनंतर 5 विजयासह 10 पॉईंट्स आहेत. त्यामुळे ‘प्ले ऑफ’च्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी मुंबईला उर्वरित 2 मॅच कोणत्याही परिस्थितीत जिंकाव्या लागतील.
मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) या पराभवानंतर निराश झाला आहे. त्यानं दिल्लीविरुद्ध झालेल्या पराभवाचं मुख्य कारण सांगितलं आहे. दिल्लीची मॅच झाल्यानंतर रोहितनं सांगितलं की, 'आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळ केला नाही. त्यामुळे आम्ही 'प्ले ऑफ'मध्ये प्रवेश करु शकलेलो नाहीत. बॅटरनी रन काढले नाहीत तर मॅच जिंकणे अवघड होते. हे मी वैयक्तिक रित्याही मान्य करतो. ही परिस्थिती नक्कीच निराशाजनक आहे. उर्वरित दोन सामन्यात आम्ही आमच्या लौकिकानुसार खेळ करु अशी आशा आहे.'
रोहित पुढे म्हणाला की, 'शारजाहचे मैदान अवघड असेल हे आम्हाला माहिती होते. आम्ही या मैदानावरच्या बऱ्याच मॅच पाहिल्या आहेत. इथं खेळणे आणि रन काढणे सोपे नाही. आम्ही चांगली तयारी केली होती. आम्हाला काय करायचं आहे, हे माहिती होते. आम्ही चांगली बॅटींग केली नाही. हे 170-180 चं पिच नाही, हे आम्हाला माहिती होतं. पण 140 चं देखील पिच नव्हतं. आम्ही चांगली पार्टनरशिप करु शकलो नाही.'
राजस्थानच्या विजयानं वाढली पॉईंट टेबलमधील चुरस, वाचा कोणत्या टीमला आहे संधी
मुंबई इंडियन्सच्या 2 मॅच बाकी
या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदाी बॅटींग करताना 20 ओव्हरमध्ये फक्त 129 रन केले. सूर्यकुमार यादव (33) याचा अपवाद वगळता मुंबईच्या एकाही बॅटरला मोठा स्कोअर करता आला नाही. त्यामुळे मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीकडून आवेश खान आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. मुंबईची पुढची लढत 5 ऑक्टोबर रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. तर त्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध शेवटची मॅच होईल.
IPL 2021 : एक दिवस दोन सामने, पण Mumbai vs Pune लढतीने वाढवलं Thrill
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.