Home /News /sport /

IPL 2021, Points Table: राजस्थानच्या विजयानं वाढली पॉईंट टेबलमधील चुरस, वाचा कोणत्या टीमला आहे संधी

IPL 2021, Points Table: राजस्थानच्या विजयानं वाढली पॉईंट टेबलमधील चुरस, वाचा कोणत्या टीमला आहे संधी

इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) चुरस आणखी वाढली आहे. शनिवारी झालेल्या डबल हेडरनंतर आता चार टीमचे समान पॉईंट्स झाले आहेत.

    मुंबई, 3 ऑक्टोबर : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सिझनमध्ये (IPL 2021) चुरस आणखी वाढली आहे. शनिवारी झालेल्या डबल हेडरनंतर आता चार टीमचे समान पॉईंट्स झाले आहेत. राजस्थान रॉयल्सनं चेन्नई सुपर किंग्सचा (RR vs CSK) 7 विकेट्सनं पराभव केला. तर दिल्ली कॅपिटल्सनं पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सला (MI vs DC) 4 विकेट्नं पराभूत केलं. आयपीएलच्या प्ले ऑफ लढतीसाठी आता चार टीममध्ये चुरस आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीमनी ‘प्ले ऑफ’ मध्ये प्रवेश केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आहे. आरसीबीचे 11 मॅचनंतर 14 पॉईंट्स आहेत. चौथ्या नंबरवर कोलकाता, पाचव्या नंबरवर पंजाब, सहाव्या नंबरवर राजस्थान आणि सातव्या नंबरवर मुंबई इंडियन्स असून या चारही टीमचे प्रत्येकी 10 पॉईंट्स आहेत. माजी चॅम्पियन सनरायझर्स हैदराबादचं (SRH) या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. आता 3 ऑक्टोबर रोजी आरसीबी विरुद्ध पंजाब (RCB vs PBKS) यांच्यात मॅच आहे. ही मॅच बंगळुरुनं जिंकली तर त्यांचे 16 पॉईंट्स होतील आणि ती टीम ‘प्ले ऑफ’ साठी पात्र होईल. पण, पंजाब विजयी झाले तर 12 पॉईंट्ससह केएल राहुलची टीम टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. IPL 2021 : मुंबईला एकाच दिवशी दोन धक्के, CSK विरुद्ध राजस्थानचा दणदणीत विजय रविवारची दुसरी लढत कोलकाता विरुद्ध हैदराबाद (KKR vs SRH) यांच्यात होणार आहे. या मॅचमध्ये हैदराबादची टीम कोलकाताच्या मार्गात अडथळा आणू शकते. कारण, ही टीम या स्पर्धेतून पहिल्यांदाच बाहेर गेली असून त्यांना विजय किंवा पराजयानं काही फरक पडणार नाही. 4 ऑक्टोबर रोजी दिल्ली विरुद्ध चेन्नई (DC vs CSK) यांच्यात लढत आहे. या दोन्ही टीम ‘प्ले ऑफ’साठी पात्र  ठरल्या आहेत. त्यामुळे या मॅचचा निकाल काहीही लागला तरी फरक पडणार नाही. IPL 2021 : मुंबई इंडियन्सचा आणखी एक खराब सिझन, रोहितला 'त्रास' देणाऱ्या इतिहासाची पुनरावृत्ती! शारजाहमध्ये 5 ऑक्टोबर रोजी मुंबई आणि राजस्थान आमने-सामने (MI vs RR) असतील. या मॅचमध्ये पराभूत होणाऱ्या टीमचं आव्हान जवळपास संपुष्टात येईल. तर 6 ऑक्टोबर रोजी अबुधाबीमध्ये बंगळुरुसमोर हैदराबादचं (RCB vs SRH) आव्हान असेल. त्यानंतर 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी डबल हेडर होणार आहेत. POINTS TABLE: 7 तारखेला दुबईत चेन्नई आणि पंजाब (PBKS vs CSK) आमने-सामने असतील. तर शारजाहमध्ये राजस्थान आणि कोलकातामध्ये (RR vs KKR) लढत होणार आहे. 8 ऑक्टोबर रोजी एकाच वेळी दोन मॅच होणार आहेत. यापैकी पहिली मॅच बंगळुरु विरुद्ध दिल्ली (RCB vs DC) यांच्यात दुबईला होणार आहे. तर दुसरी मॅच मुंबई विरुद्ध हैदराबाद (MI vs SRH) यांच्यात अबुधाबीमध्ये होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, IPL 2021, Mumbai Indians

    पुढील बातम्या