Home /News /sport /

IPL 2021 Final: आयपीएलमधील हिट जोडी आहे KKR च्या विजेतेपदातील मोठा अडथळा

IPL 2021 Final: आयपीएलमधील हिट जोडी आहे KKR च्या विजेतेपदातील मोठा अडथळा

आयपीएल फायनलमध्ये (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) या सिझनमधील सर्वात हिट जोडी केकेआरच्या मार्गातील मोठा अडथळा असणार आहे.

     नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: आयपीएल 2021 चा विजेता कोण होणार? याचं उत्तर आता काही तासांमध्ये मिळणार आहे. तीन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स आणि दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात ही मॅच फायनल होणार आहे. या फायनलमध्ये (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) आयपीएल सिझनमधील सर्वात हिट जोडी केकेआरच्या मार्गातील मोठा अडथळा असणार आहे. चेन्नई सुपर किंग्सची ओपनिंग जोडी ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि फाफ ड्यूप्लेसी (Faf Du Plesis) सध्या फॉर्मात आहे. या जोडीनं या स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ केला आहे. त्यांच्या कामगिरीमुळेच गेल्या सिझनमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईनं फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऋतुराज-ड्यूप्लेसी जोडीनं या सिझनमध्ये 1150 रन काढले आहेत. हे कोणत्याही टीमच्या ओपनिंग जोडीपेक्षा जास्त आहेत. या जोडीनं आयपीएल 2021 मध्ये सीएसकेसाठी 2 शतकी आणि 4 अर्धशतकी पार्टनरशिप केल्या आहेत. या सिझनमध्ये सर्वात जास्त रन काढणाऱ्या टॉप 5 बॅटरमध्ये त्यांचा समावेश आहे. ऋतुराजनं 603 तर ड्यूप्लेसीनं 547 रन काढले आहेत. दोघांनी मिळून या सिझनमध्ये 9 अर्धशतक झळकावली आहेत. तर यूएई लेगमध्ये 400 पेक्षा जास्त रन करणारा ऋतुराज हा एकमेव खेळाडू आहे. IPL 2021 Final Live Streaming: KKR vs CSK फायनल कधी आणि कुठे पाहता येणार? ऑरेंज कॅपचा मजबूत दावेदार असलेल्या ऋतुराजला पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कॅप्टन केएल राहुल (626) मागं टाकण्यासाठी आणखी 24 रनची आवश्यकता आहे. ऋतुराजच्या विरुद्ध शॉर्ट बॉलचा वापर खूप कमी करण्यात आला आहे. त्यानं या सिझनमध्ये 3 वेळा शॉर्ट बॉलवर विकेट गमावली आहे. त्याला रोखण्यासाठी फास्ट गतीनं टाकण्यात आलेला शॉर्ट बॉल उपयुक्त ठरु शकतो. कोलकाताचा लॉकी फर्ग्यूसन तसा बॉल टाकू शकतो. IPL 2021 Final: 'या' भारतीय खेळाडूला शेवटची संधी, फेल गेला तर करिअर समाप्त? फाफ ड्यू प्लेसीनं या आयपीएल सिझनमध्ये 137 च्या स्ट्राईक रेटनं रन बनवले आहेत. फास्ट बॉलर्सच्या विरुद्ध 'पॉवर प्ले' मध्ये त्याचा स्ट्राईक रेट 142 आहे. ड्यू प्लेसीला रोखण्यासाठी केकेआरचा कॅप्टन मॉर्गन सुनीन नरीनचा वापर करु शकतो. नरीनचा ड्यूप्लेसी विरुद्ध रेकॉर्ड चांगला आहे. नरीनं अलीकडच्या काळात त्याला दोन वेळा आऊट केलं आहे. तसंच ड्यू प्लेसीचा नरीन विरुद्ध स्ट्राईक रेट फक्त 67 आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या