Home /News /sport /

IPL 2021 Final: 'या' भारतीय खेळाडूला शेवटची संधी, फेल गेला तर करिअर समाप्त?

IPL 2021 Final: 'या' भारतीय खेळाडूला शेवटची संधी, फेल गेला तर करिअर समाप्त?

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्यात शुक्रवारी फायनल होणार आहे. ही आयपीएल फायनल टीम इंडियाच्या एका अनुभवी क्रिकेटपटूसाठी शेवटची मॅच ठरु शकते.

    मुंबई, 15 ऑक्टोबर:  कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्यात शुक्रवारी फायनल होणार आहे. यापूर्वी सीएसकेनं 3 वेळा तर केकेआरनं 2 वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. या यादीमध्ये आणखी एक विजेतेपद वाढवण्याच्या उद्देशानं दोन्ही टीम मैदानात उतरतील. ही आयपीएल फायनल टीम इंडियाच्या एका अनुभवी क्रिकेटपटूसाठी शेवटची मॅच ठरु शकते. केकेआर आणि टीम इंडियाचा अनुभवी विकेट किपर दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) या आयपीएल सिझनमध्ये निराशा केली आहे. कार्तिकच्या टीमनं आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला असला तरी त्याची बॅट शांत आहे. कार्तिकनं या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2021) 16 मॅच खेळल्या आहेत. त्यामध्ये त्यानं 23.77 च्या सरासरीनं 131.28 स्ट्राईक रेटनं फक्त 214 रन काढले आहेत. या सिझनमध्ये त्याला अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. केकेआरची मिडल ऑर्डर या स्पर्धेत फ्लॉप ठरली आहे. याला कारण इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि दिनेश कार्तिक या आजी-माजी कॅप्टनचा फॉर्म आहे. केकेआरच्या टॉप ऑर्डरनं चांगली सुरूवात केल्यानंतरही त्याचा फायदा उठवण्यात या अनुभवी जोडीला अपयश आले आहे. दिल्ली विरुद्ध झालेल्या क्वालिफायर 2 मध्ये हे दोघंही शून्यावर आऊट झाले होते. त्यामुळे केकेआरची अवस्था बिकट झाली होती. IPL 2021 Final: KKR घेणार मोठा निर्णय, कॅप्टन मॉर्गनची होणार टीममधून हकालपट्टी! चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणाऱ्या फायनलमध्ये कार्तिकला कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठा स्कोअर करावा लागेल. त्यामध्ये त्याला अपयश आलं तर केकेआरसह अन्य टीम त्याला पुढील वर्षी खरेदी करण्याची शक्यता कमी आहे. 36 वर्षांचा कार्तिक बराच काळापासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. अनेक तरुण खेळाडूंचा उदय झाल्यानं निवड समिती त्याला पुन्हा संधी देण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याचं क्रिकेट करिअर समाप्त झाल्याचं मानलं जात आहे. कार्तिक भारताच्या इंग्लंड दौऱ्यात कॉमेंट्री करताना दिसला होता. तेव्हाच त्यानं रिटायरमेंटनंतरचे नियोजन केल्याची चर्चा सुरू झाली होती.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या