Home /News /sport /

IPL 2021 Final Live Streaming: KKR vs CSK फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

IPL 2021 Final Live Streaming: KKR vs CSK फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्या फायनल मॅच शुक्रवारी होणार आहे.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (Kolkata Knight Riders vs Chennai Super Kings) यांच्या फायनल मॅच शुक्रवारी होणार आहे. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सनं (CSK) संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण खेळ करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर पॉईंट टेबलमध्ये सातव्या क्रमांकापर्यंत घसरलेल्या केकेआरनं (KKR) कमबॅक करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नईनं यापूर्वी 2010, 2011, आणि 2018 साली आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. तर केकेकेआरनं 2012 आणि 2014 साली ही स्पर्धा जिंकली आहे. मागच्या वर्षी लीग स्टेजला बाहेर पडलेल्या चेन्नईची टीम आता विजेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. त्यांना हे विजेतेपद मिळवण्यासाठी वरुण चक्रवर्ती, सुनील नरीन आणि शाकीब अल हसन या केकेआरच्या स्पिनर्सचं कडवं आव्हान असेल. या त्रिकुटानं या स्पर्धेत 7 पेक्षा कमी इकोनॉमी रेटनं रन दिले आहेत. केकेआरची मिडल ऑर्डर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गडगडली होती. त्यांना फायनलमध्ये ही चूक करुन चालणार नाही. शूभमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी आणि नितिश राणा या टॉप ऑर्डरवर केकेआरची भिस्त असेल.  या भारतीय खेळाडूंनी नेहमी टीमला चांगली सुरूवात करुन दिली आहे. IPL 2021 Final: ...तर KKR चा विजय पक्का, 'हा' रेकॉर्ड पाहून धोनीची उडणार झोप! किती वाजता सुरू होणार फायनल? आयपीएल 2021 ची फायनल  15 ऑक्टोबर शुक्रवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 7 वाजता होईल. आयपीएल 2021 चं लाईव्ह प्रसारण कुठे? आयपीएल 2021 चं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे. लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? आयपीएल 2021 च्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे. IPL Final खेळत नाही, तरी Dhoni च्या CSK साठी लकी ठरणार हा खेळाडू, 3 टीमना मिळालाय विजय जिओवरही पाहता येणार मॅच रिलायन्स जिओदेखील आपल्या ग्राहकांना आयपीएल मॅचची सुविधा देणार आहे. पोस्ट-पेड आणि प्री-पेड ग्राहकांना ही सुविधा मिळेल. जियोचे सगळे पोस्ट पेड ग्राहक आयपीएल मॅच फ्रीमध्ये पाहू शकतील. जिओ टीव्हीवर प्रेक्षकांना आयपीएल सामने पाहता येतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR

    पुढील बातम्या