मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 Final: आयपीएल फायनलमध्ये CSK चा रेकॉर्ड खराब, धोनीची टीम यंदा लकी ठरणार?

IPL 2021 Final: आयपीएल फायनलमध्ये CSK चा रेकॉर्ड खराब, धोनीची टीम यंदा लकी ठरणार?

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे.

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे.

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे.

मुंबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सची (Chennai Super Kings) लढत कोलकाता नाईट रायडर्सशी (Kolkata Knight Riders) होणार आहे. सीएसकेनं (CSK) आजवर तीन वेळा तर केकेआरनं (KKR) दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मागील सिझनमध्ये सातव्या क्रमांकावर असलेल्या सीएसकेनं यंदा सर्वप्रथम फायनलमध्ये जागा मिळवली. तर केकेआरनं अनेक अडथळ्यांवर मात करत फायनलपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे.

चेन्नईनं आयपीएल फायनलमध्ये प्रवेश तरी केला आहे. पण महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) टीमचा फायनलमधील इतिहास फारसा चांगला नाही. सीएसकेनं आत्तापर्यंत आठ वेळा आयपीएल फायनल खेळली आहे. त्यापैकी पाच वेळा त्यांना पराभव सहन करावा लागला आहे. त्यामुळे चेन्नईची टीम शुक्रवारी केकेआरविरुद्ध फायनलमध्ये खेळण्यासाठी उतरेल त्यावेळी त्यांना हा रेकॉर्ड आणखी खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल.

..तर KKR चा विजय पक्का, 'हा' रेकॉर्ड पाहून धोनीची उडणार झोप!

KKR फायनलमध्ये अजिंक्य

दुसरिकडं केकेआरचा फायनलमधील रेकॉर्ड जबरदस्त आहे. या टीमनं यापूर्वी दोन वेळा आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही वेळा त्यांनी अजिंक्यपद पटाकवले आहे. त्यांनी यापूर्वी 2014 साली किंग्ज इलेव्हन पंजाबचा (पंजाब किंग्ज) पराभव करत विजेतेपद पटकावले होते. तर त्याच्या दोन वर्ष आधी म्हणजेच 2012 साली केकेआरनं सीएसकेचा आयपीएल फायनलमध्ये पराभव केला होता.

मुंबईनं केला तीनदा पराभव

चेन्नई सुपर किंग्सचा आयपीएल फायनलमध्ये पाच पैकी तीन वेळा मुंबई इंडियन्सनं पराभव केला आहे. आयपीएल 2019 फायनलमध्ये या दोन्ही टीम एकमेकांच्या समोर आल्या होत्या. त्यावेळी मुंबई इंडियन्सनं त्यांचा 1 रननं निसटता पराभव केला होता.

दिल्लीच्या पराभवानंतर दिग्गज खेळाडूचं करिअर समाप्त! टीम इंडियातही मिळणार नाही जागा

चेन्नई सुपर किंग्सचा आजवर आयपीएल फायनलमध्ये कधी पराभव झाला आहे पाहूया

2019- मुंबई इंडियन्सकडून 1 रननं पराभव

2015 - मुंबई इंडियन्सकडून 41 रननं पराभव

2013 - मुंबई इंडियन्सकडून 23 रननं पराभव

2012 - कोलकाता नाईट रायर्डसकडून 5 विकेट्सनं पराभव

2008 - राजस्थान रॉयल्सकडून 3 विकेट्सनं पराभव

First published:

Tags: Csk, IPL 2021, KKR