मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Final: ...तर KKR चा विजय पक्का, 'हा' रेकॉर्ड पाहून धोनीची उडणार झोप!

IPL 2021 Final: ...तर KKR चा विजय पक्का, 'हा' रेकॉर्ड पाहून धोनीची उडणार झोप!

पहिल्या हाफमध्ये झगडणाऱ्या केकेआरनं यूएई लेगमध्ये 9 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत. आयपीएल फायनलमधील केकेआरचा (KKR) रेकॉर्ड पाहून महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) झोप उडाली आहे.

पहिल्या हाफमध्ये झगडणाऱ्या केकेआरनं यूएई लेगमध्ये 9 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत. आयपीएल फायनलमधील केकेआरचा (KKR) रेकॉर्ड पाहून महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) झोप उडाली आहे.

पहिल्या हाफमध्ये झगडणाऱ्या केकेआरनं यूएई लेगमध्ये 9 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत. आयपीएल फायनलमधील केकेआरचा (KKR) रेकॉर्ड पाहून महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) झोप उडाली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 14 ऑक्टोबर:  पाच महिने, दोन देश आणि 59 मॅचनंतर आयपीएल फायनलचं (IPL 2021 Final) चित्र स्पष्ट झालं आहे.  महेंद्रसिंह धोनीची (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि इयन मॉर्गनची (Eoin Morgan) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात शुक्रवारी दुबईमध्ये आयपीएल फायनल होणार आहे. सीएसकेनं (CSK) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) क्वालिफायरमध्ये पराभव करत आयपीएल फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर केकेआरनं (KKR) आरसीबी आणि दिल्लीचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली आहे.

...तर केकेआरचा विजय नक्की

पहिल्या हाफमध्ये झगडणाऱ्या केकेआरनं यूएई लेगमध्ये 9 पैकी 7 मॅच जिंकल्या आहेत. या 7 पैकी 6 विजय केकेआरनं रनचा पाठलाग करताना मिळवले आहेत. तर केकेआरचे दोन्ही पराभव हे पहिल्यांदा बॅटींग करताना झाले आहेत. केकेआरनं यूएई लेगमध्ये 6 वेळा दुसऱ्यांदा बॅटींग केली आहे. या सर्व वेळा मॉर्गनच्या टीमनं विजय मिळवला आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) या दोनच टीमनं यूएई लेगमध्ये केकेआरचा पराभव केला असून या दोन्ही मॅचमध्ये केकेआरनं पहिल्यांदा बॅटींग केली आहे. त्यामुळे केकेआरची पहिल्यांदा फिल्डिंग आली तर त्यांचा विजय नक्की आहे.

SCHEDULE TIME TABLE:

IPL फायनलमध्येही रेकॉर्ड

केकेआरचा टार्गेट चेस करतानाचा रेकॉर्ड हा या आयपीएलपुरता मर्यादीत नाही. तर आयपीएल फायनलमध्येही त्यांनी हा रेकॉर्ड केला आहे. आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक रनचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड देखील केकेआरच्या नावावर आहे. गौतम गंभीरच्या टीमनं आयपीएल 2014 मध्ये (IPL 2014) हा रेकॉर्ड केला आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध झालेल्या त्या मॅचमध्ये (Punjab Kings vs Kolkata Knight Riders) केकेआरनं 200 रनचा पाठलाग यशस्वी पूर्ण केला होता. हा आयपीएल फायनलमधील रेकॉर्ड आहे. पंजाबनं पहिल्यांदा बॅटींग करताना वृद्धीमान साहाच्या शतकाच्या जोरावर 4 आऊट 199 रन केले होते.

पुणेकर ‘राहुल’ ठरला शाहरुखच्या टीमचा ‘हिरो’, SIX लगावत काढलं फायनलचं तिकीट

केकेआरनं हे आव्हान 3 विकेट्स राखून पूर्ण केलं. मनिष पांडेनं त्या फायनलध्ये केकेआरकडून सर्वाधिक रन केले होते. पांडेनं 50 बॉलमध्ये 94 रनची खेळी केली होती.  त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सची विजेतेपदाची  हॅट्ट्रिकही कोलकातानं आयपीएल फायनलमध्ये रनचा पाठलाग करुन चुकवली होती. त्या फायनलमध्ये केकेआरनं 191 रनचं टार्गेट 5 विकेट्स राखून पूर्ण केलं होतं.

विजयाच्या जवळ येऊनही ‘दिल्ली’ दूरच, मॅच हरताच पंत, पृथ्वीचे अश्रू अनावर VIDEO

या आयपीएलमध्येही केकेआरची टीम चांगलीच फॉर्मात आहे. यूएई लेगमध्ये  रनचा पाठलाग करताना एकही मॅच त्यांनी हरलेली नाही. फायनलमध्येही टॉस जिंकला तर मॉर्गन पहिल्यांदा फिल्डिंग घेण्याची शक्यता आहे. केकेआरचा हा भक्कम रेकॉर्ड पाहून महेंद्रसिंह धोनीची झोप उडाली आहे.

First published:

Tags: Csk, IPL 2021, KKR