मुंबई, 14 ऑक्टोबर: आयपीएल 2021 मधील दुसऱ्या क्वालिफायर मॅचमध्ये (IPL 2021 Qualifier 2) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 3 विकेट्सनं निसटता पराभव झाला. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या दिल्लीला आयपीएल प्ले ऑफमध्ये (IPL 2021 Play off) सलग दोन पराभव पत्कारावे लागले. त्यामुळे आयपीएल विजेतेपद मिळवण्याचं या टीमचं स्वप्न पुन्हा एकदा लांबणीवर पडलं आहे. दिल्लीच्या या पराभवाचा सर्वात मोठा फटका त्यांच्या स्टार खेळाडूला बसणार आहे.
आयपीएल स्पर्धेच्या पुढील सिझनपूर्वी (IPL 2022) मेगा ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्स शिखर धवनला (Shikhar Dhawan) रिटेन करण्याची शक्यता कमी आहे. शिखर धवननं या आयपीएलमधील 16 मॅचमध्ये 39.13 च्या सरासरीनं आणि 124.62 च्या स्ट्राईक रेटनं 587 रन काढले. तो सर्वाधिक रन काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीमध्येही होता. मात्र त्यानं हे बहुतेक रन पहिल्या फेजमध्ये भारतात काढले आहेत.
दिल्लीला पॉईंट टेबलमध्ये टॉपवर नेण्यात शिखरचं मोलाचं योगदान होतं. पण, यूएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या सेकंड हाफमध्ये त्याची बॅट बहुतेक मॅच शांत होती. शिखर धवनला पुढील वर्षी आयपीएल टीमनं खरेदी केलं नाही तर टीम इंडियाच्या गब्बरची क्रिकेट कारकिर्द संपण्याची शक्यता आहे.
विजयाच्या जवळ येऊनही ‘दिल्ली’ दूरच, मॅच हरताच पंत, पृथ्वीचे अश्रू अनावर VIDEO
शिखर धवननं टीम इंडियाच्या टेस्ट आणि वन-डे टीममधील जागा गमावली आहे. यावर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही त्याची निवड झालेली नाही. त्याचा फॉर्म आणि बॅटींगची शैली पाहता त्याची टीम इंडियातील वन-डे टीममधील जागाही आता धोक्यात आली आहे. निवड समितीसमोर अनेक पर्याय असल्यानं त्याला आणखी एक संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे.
पुणेकर ‘राहुल’ ठरला शाहरुखच्या टीमचा ‘हिरो’, SIX लगावत काढलं फायनलचं तिकीट
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये धवननं सुनील नरीनला सलग दोन सिक्स लगावत सुरूवात चांगली केली होती. पण नंतर त्याची गती संथ झाली. पृथ्वी शॉ आऊट झाल्यानंतर वेगानं रन काढण्यात तो अपयशी ठरला. अखेर 39 बॉलमध्ये 36 रन काढून धवन आऊट झाला. या इनिंगमध्ये धवनचा स्ट्राईक रेट 92.30 होता. जो टी20 क्रिकेटसाठी कमी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi capitals, IPL 2021, Shikhar dhawan