IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सने हरवल्यानंतर रोहित शर्माला आणखी एक झटका, भरावा लागणार 12 लाखांचा दंड

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सने हरवल्यानंतर रोहित शर्माला आणखी एक झटका, भरावा लागणार 12 लाखांचा दंड

IPL 2021: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वामध्ये खेळणाऱ्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरोधात हार पत्करावी लागली आहे. या पराभवानंतर रोहित शर्माला एक नियम मोडल्यामुळे दंड देखील भरावा लागणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वामध्ये खेळणाऱ्या रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरोधात हार पत्करावी लागली आहे. आयपीएलच्या (IPL 2021) या तेराव्या सामन्यात मुंबईला 6 विकेट्सनी पराभव (MI vs DC) पत्करावा लागला. या विजयाबरोबर दिल्लीने मुंबईविरोधात सलग पाच वेळा हरण्याचा क्रमही तोडला आहे. पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या फलंदाजीमध्ये मुंबईने दिल्लीला 138 धावांचे लक्ष्य दिले होते. उत्तरादाखल नवखा कॅप्टन असणाऱ्या ऋषभ (Rishabh Pant) ने पाच चेंडू शिल्लक असताना केवळ 4 विकेट्स गमावत विजय मिळवला. मुंबईचा हा दुसरा पराभव आहे.

रोहितला द्यावा लागणार 12 लाखांचा दंड

दरम्यान या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आणखी एक धक्का बसला आहे. रोहितला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. रोहितवर स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) साठी हा दंड भरावा लागणार आहे. मुंबईच्या टीमने निश्चित वेळेमध्ये ओव्हर्स न टाकल्याने कर्णधाराला हा दंड भरावा लागणार आहे. आयपीएलच्या या सीझनमध्ये मुंबईने अशाप्रकारे पहिल्यांदा चूक केली आहे आणि त्यामुळे त्यांना आयपीएल कोड ऑफ कंडक्ट अंतर्गत दंड भरावा लागणार आहे.

पूर्वी होता असा नियम

बीसीसीआयने असा नियम बनवला आहे, ज्यामुळे प्रत्येक संघाला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे. यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, परंतु आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण करावं लागणार आहे. शिवाय या 90 मिनिटांत संघाला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघांला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.1 ओव्हर  टाकावी लागतील.

(हे वाचा-IPL 2021 : मुंबईसमोर पंतचं ट्रम्प कार्ड, रोहित शर्माही हैराण)

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास 12 लाख रुपयांचा दंड आणि पुढील दोन सामन्यांमध्ये पुन्हा तीच चूक केली तर कर्णधाराला कडक शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. पहिल्यांदा ही चूक झाली तर कॅप्टनला 12 लाखांचा दंड, दुसऱ्यांदा चूक झाली तर कॅप्टनला 24 लाखांचा दंड तिसऱ्या चुकीसाठी कॅप्टनवर एका मॅचची बंदी असा नियम आहे. तर दुसऱ्यांदा या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 25 टक्के रक्कम (यापैकी जे कमी असेल ते) दंड, तिसऱ्या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) दंड म्हणून द्यावी लागेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 21, 2021, 8:10 AM IST

ताज्या बातम्या