Home /News /sport /

IPL 2021 : मुंबईसमोर पंतचं ट्रम्प कार्ड, रोहित शर्माही हैराण

IPL 2021 : मुंबईसमोर पंतचं ट्रम्प कार्ड, रोहित शर्माही हैराण

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) दिग्गज बॅट्समनचा संघर्ष सुरुच आहे. दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचमध्येही मुंबईला पहिले बॅटिंग करुन फक्त 137 रनच करता आल्या.

    मुंबई, 20 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) दिग्गज बॅट्समनचा संघर्ष सुरुच आहे. दिल्लीविरुद्धच्या (Delhi Capitals) मॅचमध्येही मुंबईला पहिले बॅटिंग करुन फक्त 137 रनच करता आल्या. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात 4 सामन्यांमध्ये मुंबईच्या फक्त एकाच बॅट्समनला अर्धशतक करता आलं आहे. केकेआरविरुद्ध (KKR) सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 56 रनची खेळी केली होती. मुंबईने आतापर्यंत सगळे सामने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर खेळले आहेत, त्यामुळेही मुंबईच्या आक्रमक बॅट्समनना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसरीकडे दिल्लीने त्यांचे सुरुवातीचे तिन्ही सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळले. जिकडे बॅट्समनना मदत मिळते. चेन्नईच्या मैदानात मोसमातली पहिलीच मॅच खेळणाऱ्या दिल्लीने या सामन्यात त्यांचं ट्रम्प कार्ड मैदानात उतरवलं, आणि हेच ट्रम्प कार्ड मुंबईसाठी घातक ठरलं. दिल्लीने चेन्नईच्या स्पिनरना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर अमित मिश्राला (Amit Mishra) संधी दिली. अमित मिश्रानेही त्याच्या अनुभवाचा फायदा घेत मुंबईच्या तगड्या बॅटिंगला खिंडार पाडलं. अमित मिश्राने 4 ओव्हरमध्ये 24 रन देऊन 4 विकेट घेतल्या. अमित मिश्राने रोहित शर्मा, इशान किशन, कायरन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याची विकेट घेतली. अमित मिश्रा हा आयपीएलमधला लसिथ मलिंगा नंतरचा दुसरा सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. अमित मिश्राने आयपीएलच्या 152 सामन्यांमध्ये 156 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल इतिहासात अमित मिश्राने सर्वाधिक वेळा रोहित शर्माची विकेट घेतली आहे. अमित मिश्राने आतापर्यंत 7 वेळा रोहित शर्माला आऊट केलं आहे, तर सुनिल नारायणने (Sunil Narine) 6 वेळा आणि आर. विनय कुमारने (Vinay Kumar) 6 वेळा रोहितला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, IPL 2021, Mumbai Indians, Rishabh pant, Rohit sharma

    पुढील बातम्या