• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 दरम्यान World Test Championship जिंकण्याची तयारी करणार Team India

IPL 2021 दरम्यान World Test Championship जिंकण्याची तयारी करणार Team India

आयपीएल नंतर 18 ते 22 जून महिन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (World Test Championship) फायनल होणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 एप्रिल: टीम इंडियाचे (Team India) सर्व प्रमुख खेळाडू आगामी दोन महिने आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) व्यस्त असतील. आयपीएल नंतर 18 ते 22 जून महिन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची  (World Test Championship) फायनल होणार आहे. तसेच त्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यात इंग्लंडमध्ये पाच टेस्टची मालिका होणार आहे. या स्पर्धेची तयारी करण्यासाठी भारतीय टेस्ट टीममधील खेळाडूंना नेट्समध्ये ड्यूक बॉल उपलब्ध करुन देण्याची तयारी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) दाखवली आहे. अर्थात संपूर्णपणे वैकल्पिक पर्याय असणार आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव उघड न करण्याच्या अटीवर 'पीटीआय' शी बोलताना सांगितले की, "कोणत्याही खेळाडूची रेड बॉलनं सराव करण्याची इच्छा असेल तर बीसीसीआय त्यांना रेड ड्यूक बॉल उपलब्ध करुन देईल. तसंच राष्ट्रीय टीमचे कोचही त्यांना गरज भासल्यास मदत करण्यासाठी सज्ज असतील. आयपीएल फायनल आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये फक्त 20 दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे बोर्डानं हा पर्याय शोधला आहे. या अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आयपीएल स्पर्धा 29 मे रोजी संपणार आहे. भारतीय टीम 30 किंवा 31 मे रोजी इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाली तरी त्यांना एक आठवडा क्वारंटाईन राहावं लागेल. या परिस्थितीमध्ये भारतीय खेळाडूंना सरावासाठी फक्त 10 दिवसांचा वेळ मिळणार आहे. न्यूझीलंडची टीम ही इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट मॅचची मालिका खेळून फायनलमध्ये उतरणार आहे. तर भारतीय टीम बराच काळ टी20 क्रिकेट खेळून फायनल खेळणार आहे." (IPL आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी, हा भारतीय खेळाडू इंग्लडला रवाना) अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडूंना आयपीएलमध्ये जास्त खेळायला संधी मिळणार नाही. त्यामुळे ते या वेळेचा उपयोग टेस्ट मॅचची तयारी करण्यासाठी करु शकतात.
  Published by:News18 Desk
  First published: