मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL सुरू व्हायच्या आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी, हा भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना

IPL सुरू व्हायच्या आधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तयारी, हा भारतीय खेळाडू इंग्लंडला रवाना

एकीकडे भारतात आयपीएलची (IPL 2021) धूम सुरू आहे, पण भारतीय टेस्ट टीमचा खेळाडू हनुमा विहारी (Hanuma Vihari) इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (ICC World Test Championship Final) इंग्लंडमध्ये होणार आहे, त्याच्या तयारीसाठी विहारी इंग्लंडला गेला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 6 एप्रिल : आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) आता अवघे काही दिवस शिल्लक आहे. 9 एप्रिलपासून यंदाच्या पर्वाला सुरूवात होणार आहे, त्याआधी सगळे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. पण एकीकडे आयपीएलची धूम सुरू असतानाच भारतीय टेस्ट टीमचा खेळाडू हनुमा विहारी (Hanuma Vihari) इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (ICC World Test Championship Final) इंग्लंडमध्ये होणार आहे, त्याच्या तयारीसाठी विहारी इंग्लंडला गेला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जूनपर्यंत भारत आणि न्यूझीलंडमध्ये साऊथम्पटनमध्ये होईल.

फायनलनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिजही खेळवली जाईल. आयपीएल लिलावामध्ये हनुमा विहारीला कोणत्याच टीमने विकत घेतलं नाही, यानंतर इंग्लंडमधली काऊंटी टीम वारविकशायरने त्याच्यासोबत करार केला. बर्मिंघमच्या या काऊंटी क्लबकडून विहारी कमीत कमी तीन मॅच खेळेल. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी वारविकशायरकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

2019 साली हनुमा विहारी दिल्ली कॅपिटल्ससोबत होता, पण टेस्ट स्पेशलिस्टचा शिक्का लागल्यामुळे विहारीला नंतर आयपीएलमध्ये संधी मिळाली नाही. 27 वर्षांच्या हनुमा विहारीने भारताकडून 12 टेस्टमध्ये 32 पेक्षा जास्तच्या सरासरीने 624 रन केले आहेत, यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे.

सिडनी टेस्टमध्ये मांसपेशींना दुखापत झाल्यानंतरही हनुमा विहारीने 4 तास बॅटिंग करून नाबाद 23 रन केले. विहारीने अश्विनच्या मदतीने सिडनी टेस्ट ड्रॉ केली, यानंतर भारताने सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. दुखापतीमुळे विहारी एनसीएमध्ये उपचार घेत होता, यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमधून पुनरागमन केलं.

यावेळी रणजी ट्रॉफी स्पर्धाही रद्द करण्यात आली, त्यामुळे विहारीला सरावाची गरज आहे. टेस्ट टीमचे अन्य सदस्य आयपीएल खेळणार आहेत, यावेळी पुजाराही आयपीएलचा भाग आहे. त्यामुळे हनुमा विहारीला मॅच प्रॅक्टीस आणि मैदानात वेळ घालवण्याची गरज आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात आलं. मागच्या काही वर्षांमध्ये बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्याआधी खेळाडूंना काऊंटी खेळायला पाठवलं. यामध्ये इशांत शर्मा, आर.अश्विन आणि अक्षर पटेल यांचा समावेश होता.

First published:

Tags: Hanuma vihari, Icc, International, IPL 2021, Sydney, Test cricket