Home /News /sport /

IPL 2021: 'KL राहुल टीम इंडियाच्या कॅप्टनपदासाठी योग्य नाही,' माजी क्रिकेटपटूचा दावा

IPL 2021: 'KL राहुल टीम इंडियाच्या कॅप्टनपदासाठी योग्य नाही,' माजी क्रिकेटपटूचा दावा

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध रविवारी झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्जचे (RCB vs PBKS) प्ले ऑफ गाठण्याचे समीकरण अवघड बनले आहे. पंजाबच्या या कामगिरीनंतर त्यांचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) याच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 4 ऑक्टोबर :  पंजाब किंग्जची (PBKS) टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. पंजाबनं 13 पैकी 5 मॅच जिंकल्या असून 8 मध्ये त्यांचा पराभव झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध रविवारी झालेल्या पराभवानंतर पंजाबचे प्ले ऑफ गाठण्याचे समीकरण अवघड बनले आहे. पंजाबच्या या कामगिरीनंतर त्यांचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) याच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित झाला आहे. राहुल आयपीएल 2020 पासून पंजाबचा कॅप्टन आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये पंजाबनं 25 पैकी 11 मॅच जिंकल्या असून 14 मध्ये टीमचा पराभव झाला आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा (Ajay Jadeja) यानं पंजाबच्या या कामगिरीनंतर राहुलच्या कॅप्टनसीवर टीका केली आहे. जडेजानं 'क्रिकबझ' शी बोलताना सांगितले की, ' राहुल मितभाषी असून त्याचा स्वभवाव लवचिक आहे. हा गुण तुम्हाला खेळात यशस्वी करतो, पण एक कॅप्टन म्हणून नेहमीच फायदेशीर ठरत नाही. राहुल दोन वर्षांपासून पंजाब टीमता कॅप्टन आहे. पण तो मला कधीही लीडर वाटला नाही. आरसीबी विरुद्ध पंजाबनं जी टीम खेळवली, जे बदल केले ते खरंच राहुलनं केले असतील का? असा प्रश्न त्यानं विचारला. IPL 2021: अंपायरच्या निर्णयानंतर संपला राहुलचा संयम, भर मैदानात घातला वाद! VIDEO जडेजा पुढे म्हणाला की, 'भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन होण्यासाठी तुमच्याकडं स्वत:चा विचार आणि नेतृत्त्व करण्याची क्षमता हवी. मला आजवर राहुलमध्ये ही दिसली नाही. राहुल मितभाषी आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत समन्वय साधण्याचा प्रयत्न करतो. तो टीम इंडियाचा कॅप्टनही होईल. बराच काळ ही जबाबदारी देखील सांभाळेल. कारण, समन्वयवादी व्यक्ती या पदावर दीर्घकाळ राहतो. पण, भारतीय कॅप्टनकडं स्वत:चा विचार हवा. आयपीएलची टीम सांभाळणे आणि टीम इंडियाचा कॅप्टन होणे, यामध्ये बरंच अंतर आहे.' IPL 2021: कोहलीसोबत येताच बदललं नशीब, मागच्या सिझनचा झिरो यंदा बनला हिरो 'राहुलचा स्वभाव धोनीसारखा शांत आहे. पण त्यानं पंजाब किंग्जचा कॅप्टन म्हणून स्वत:च्या खांद्यावर फार जबाबदारी घेतलेली नाही. त्यानं इतरांना टीम चालवण्याची परवानगी दिली आहे.' असंही जडेजानं यावेळी स्पष्ट केले.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: IPL 2021, Kl rahul, Punjab kings

    पुढील बातम्या