मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: कोहलीसोबत येताच बदललं नशीब, मागच्या सिझनचा झिरो यंदा बनला हिरो

IPL 2021: कोहलीसोबत येताच बदललं नशीब, मागच्या सिझनचा झिरो यंदा बनला हिरो

विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिविलियर्स (AB de Villiers) यांच्यावर अवलंबून असलेल्या आरसीबला (RCB) यंदा नवा हिरो मिळाला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिविलियर्स (AB de Villiers) यांच्यावर अवलंबून असलेल्या आरसीबला (RCB) यंदा नवा हिरो मिळाला आहे.

विराट कोहली (Virat Kohli) आणि एबी डिविलियर्स (AB de Villiers) यांच्यावर अवलंबून असलेल्या आरसीबला (RCB) यंदा नवा हिरो मिळाला आहे.

मुंबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या सिझनमध्ये (IPL 2021) विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला आहे. आरसीबीला मागच्या सिझनमध्ये शेवटपर्यंत प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी झगडावं लागलं होतं. टीमचा यापूर्वीच्या सिझनचा रेकॉर्ड तर आणखी खराब होता. यंदा मात्र आरसीबीनं दोन मॅच बाकी असतानाच 'प्ले ऑफ' मधील जागा निश्चित केली आहे. आरसीबीनं आत्तापर्यंत 12 पैकी 8 मॅचमध्ये विजय मिळवला असून 4 मॅचमध्ये पराभव स्विकारला आहे.

विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांच्यावर अवलंबून असलेल्या आरसीबला यंदा नवा हिरो मिळाला आहे. या हिरोचं नाव आहे ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell). ऑस्ट्रेलियाच्या या आक्रमक ऑल राऊंडरला आरसीबीनं तब्बल 14.25 कोटी मोजून खरेदी केलं. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाचा सर्वांनाच धक्का बसला होता. कारण मागील आयपीएलमध्ये (IPL 2020) पंजाब किंग्जकडून (Punab Kings) खेळताना मॅक्सवेलनं अतिशय सुमार कामगिरी केली होती.

या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या टीममध्ये येताच मॅक्सवेलची कामगिरी उंचावली आहे. त्यानं आत्तापर्यंत 12 मॅचमध्ये 407 रन काढले असून त्याची सरासरी 40.70 तर स्ट्राईक रेट 145.35 इतका आहे. मिडल ओव्हर्समध्ये चांगल्या बॅटींगबरोबरच फिनिशरची भूमिकाही मॅक्सवेल उत्तमपणे पार पाडत आहे. त्यानं या आयपीएलमध्ये पाच अर्धशतक झळकावले आहेत. या आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो केएल राहुलसह टॉपवर आहे.

IPL 2021: धोनी आणि विराटमध्ये होणार आता तगडी फाईट, पंत आहे दोघांच्या मार्गातील अडथळा

मॅक्सवेलनं या आयपीएलमध्ये 36 फोर आणि 19 सिक्स लगावले आहेत. तो सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे त्याला मागच्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना 13 मॅचमध्ये एकही सिक्स लगावता आला नव्हता.

MOST SIXES:

मॅक्सवेलसाठी 2014 नंतरचं हे सर्वात यशस्वी आयपीएल ठरलं आहे. 2014 साली पंजाब किंग्जकडून खेळताना मॅक्सवेलनं 16 मॅचमध्ये 552 रन काढले होते. त्या आयपीएलमध्ये पंजाबनं फायनलपर्यंत धडक मारली होती. फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर 2017 साली त्यानं 300 पेक्षा जास्त रन केले होते. त्यानंतर या सिझनमध्ये मॅक्सवेल यशस्वी झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Glenn maxwell, IPL 2021, RCB