• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: अंपायरच्या निर्णयानंतर संपला राहुलचा संयम, भर मैदानात घातला वाद! VIDEO

IPL 2021: अंपायरच्या निर्णयानंतर संपला राहुलचा संयम, भर मैदानात घातला वाद! VIDEO

आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये थंर्ड अंपायरनं दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्या मॅचमध्ये हा प्रकार घडला.

 • Share this:
  मुंबई, 4 ऑक्टोबर : आयपीएल स्पर्धेत (IPL 2021) रविवारी झालेल्या मॅचमध्ये थंर्ड अंपायरनं दिलेला निर्णय वादग्रस्त ठरला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज (RCB vs PBKS) यांच्यात ही मॅच झाली. या मॅचमध्ये आरसीबीचा ओपनिंग बॅटर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) विरुद्ध करण्यात आलेलं अपिल थर्ड अंपायरनं फेटाळलं. त्यावर पंजाबचा कॅप्टन केएल राहुल (KL Rahul) चांगलाच नाराज झाला होता. त्यानं फिल्ड अंपायर अनंत पद्मनाभन (Anantha Padmanabhan) यांच्याशी या विषयावर वाद घातला. आरसीबीच्या इनिंगमधील 8 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. पंजाबचा लेग स्पिनर रवी बिश्नोईनं टाकलेला गुगली पडिक्कलनं रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. पडिक्कलना चांगला फटका मारता आला नाही. राहुलनं त्याचा सोपा कॅच पकडला. राहुल आणि पंजाबची टीम पडिक्कल आऊट झाल्याचा आनंद साजरा करत होती. पण, फिल्ड अंपायरनं पडिक्कल नॉट आऊट असल्याचं सांगितलं. या निर्णयाच्या विरुद्ध डीआरएस घेण्यात आले. त्यावेळीही टिव्ही अंपायरना अल्ट्रा एजबाबत खात्री नव्हती. पण पडिक्कलच्या ग्लोजच्या खाली बॉल फिरल्यानंतर थोडा स्पाईक दिसत होता. अखेर पडिक्कलला नॉट आऊट घोषित करण्यात आले. यावर पंजाबचे खेळाडू नाराज झाले. कॅप्टन राहुलनं थर्ड अंपायरशी या विषयावर वादही घातला. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. या सर्व विषयावर सोशल मीडियावर जोरदार गदारोळ झाला. क्रिकेट विश्वातही याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. न्यूझीलंडचा माजी ऑल राऊंडर स्कॉट स्टायरिस देखील या विषयावर चांगलाच नाराज झाला होता. त्याने, 'तिसऱ्या अंपायरला तातडीनं बरखास्त करा, ही काय थट्टा आहे! असं ट्विट केलं. आरसीबीने पंजाब किंग्सचा (RCB vs PBKS) 6 रनने पराभव केला आहे. याचसोबत आरसीबीने प्ले-ऑफमध्येही (IPL Play Offs) प्रवेश मिळवला आहे. चेन्नई आणि दिल्लीनंतरची आरसीबी ही प्ले-ऑफला पोहोचणारी तिसरी टीम ठरली आहे. बँगलोरने दिलेल्या 165 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 158 रन करता आले. मयंक अग्रवालने सर्वाधिक 57 रन केले, तर केएल राहुल 39 रन करून आऊट झाला. मयंक आणि राहुलच्या ओपनिंग जोडीने पंजाबला 10.5 ओव्हरमध्ये 91 रन केले. आरसीबकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर जॉर्ज गार्टन आणि शाहबाज अहमदला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. IPL 2021: ब्राव्होचा मुलगा होणार पोलार्डचा जावई! 2 दिग्गज क्रिकेटपटूंचं संभाषण Viral
  Published by:News18 Desk
  First published: