नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: आयपीएल(IPL2021) हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स(SRHvsMI)मध्ये होत आहे. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20षटकांत 9 बाद 235 धावा केल्या आणि हैदराबादला 236 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी हैदराबादला 65 धावांवर रोखण्याची जबाबदारी मुंबईच्या गोलंदाजांवर होती. मात्र, ही कमान सांभळण्यात मुंबईचे गोलंदाज अपयशी ठरले. आणि मुंबईचे प्ले ऑफमध्ये जाण्याचे स्वप्न भंगले आहे. हैदराबाद विरुद्ध मुंबई सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईने प्रथम बॅटिंग करताना 20 षटकांत 9 बाद 235 धावा केल्या आणि हैदराबादला 236 धावांचे आव्हान दिले आहे. हैदराबादला 64 धावांवर गुंडाळावे लागणार होते, पण त्यांना तसे करता आले नाही. 6व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जेसन रॉयनं मारलेल्या चौकाराने गतविजेत्या या संघाच्या प्लेऑफच्या स्वप्नावर पाणी फेरले.
SRH go past the 65-run mark 💔
— Mumbai Indians (@mipaltan) October 8, 2021
We have given it our all and will continue to do so till the last ball 💙#OneFamily #MumbaiIndians #IPL2021 #SRHvMI
मुंबईकडून इशान किशन आणि कर्णधार रोहित शर्माने सलामीला फलंदाजी केली. इशान किशनने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत चौकार षटकारांची बरसात करत १६ चेंडूत अर्धशतक केले. इशान एकाबाजूने फटकेबाजी करत असताना दुसरी बाजू रोहित शर्माने सांभाळली होती. पण रोहितला राशिद खानने 6 व्या षटकांत 18 धावांवर बाद केले आणि मुंबईला पहिला धक्का दिला. पण मुंबईने पॉवर प्लेमध्ये 6 षटकांत 1 बाद 86 धावा केल्या. रोहितनंतर 9 व्या षटकात हार्दिक पंड्याला 10 धावांवर जेसन होल्डरने बाद केले. यानंतर इशान किशनचाही अडथळा उम्रान मलिकने 10 व्या षटकात दूर केला. इशानने 32 चेंडूत 11 चौकार आणि 4 षटकारासंह 84 धावा केल्या. त्यापाठोपाठ कायरन पोलार्ड 13 व्या षटकात अभिषेक शर्माचा शिकार ठरला. त्याने 13 धावा केल्या. त्याच्यापुढच्याच चेंडूवर अभिषेकने जिमी निशामला शुन्यावर माघारी धाडले. त्यामुळे मुंबईच्या धावगती संथ झाली. इशाननंतर सूर्यकुमार यादवने कमान सांभाळली. दुसऱ्या बाजूने हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या अपयशी ठरले असले तरी, सूर्याने धावगती वाढवली. 17व्या षटकात सूर्यकुमार यादवने कौलला चौकार ठोकत आपले अर्धशतक झळकावले. याच षटकात मुंबईने दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. अखेरच्या षटकात तो आणि पियुष चावला बाद झाले. त्यांना जेसन होल्डरने बाद केले. सूर्यकुमारने 40 चेंडूत13 चौकार आणि 3 षटकारांसह 82 धावा केल्या. मुंबईने 20 षटकात 9 बाद 235 धावा केल्या.

)







