मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: मुंबईच्या विजयानं विराटला दिलासा, इतर टीमची मात्र उडाली झोप!

IPL 2021: मुंबईच्या विजयानं विराटला दिलासा, इतर टीमची मात्र उडाली झोप!

पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) शेवटच्या दोन मॅचमध्ये दमदार खेळ केला. मुंबईनं या दोन्ही मॅचमध्ये मिळवलेल्या  विजयामुळे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच खूश झाला आहे

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 9 ऑक्टोबर: आयपीएल स्पर्धेतील (IPL 2021) मुंबई इंडियन्सचं (Mumbai Indians) आव्हान आता संपुष्टात आलं आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं शेवटच्या दोन मॅचमध्ये दमदार खेळ केला. मुंबईनं या दोन्ही मॅचमध्ये मिळवलेल्या  विजयामुळे टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) चांगलाच खूश झाला आहे. त्याची एक मोठी चिंता आता दूर झाली आहे. मुंबई इंडियन्सचे बॅटर इशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हे दोघंही फॉर्मात परतले आहेत. इशाननं सलग दुसऱ्या मॅचमध्ये आक्रमक अर्धशतक झळकावले. त्यानं सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध 32 बॉलमध्ये 84 रन काढले. इशाननं या खेळीत 11 फोर आणि 4 सिक्स लगावले. तर सूर्यकुमार यादवनं 40 बॉलमध्ये 82 रन काढले. त्यानं 13 फोर आणि 3 सिक्सचा वर्षाव केला. राजस्थान रॉयल्स विरुद्ध 25 बॉलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या इशाननं हैदराबाद विरुद्ध फक्त 16 बॉलमध्येच 50 रन केले. आयपीएल 2021 मधील सर्वात वेगवान अर्धशतक आहे. आयपीएल मॅचमध्ये पहिल्या 4 ओव्हरमध्ये अर्धशतक झळकावणारा इशान हा दुसरा खेळाडू बनला आहे. यापूर्वी पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कॅप्टन केएल राहुलनं (KL Rahul) 2018 साली दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध ही कामगिरी केली होती. हार्दिक पांड्या T20 वर्ल्ड कपमध्ये बॉलिंग करणार का? रोहितनं दिलं मोठं अपडेट विराटची चिंता मिटली इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही टी20 वर्ल्ड कप टीमचे सदस्य आहेत. या आयपीएलमध्ये त्यांची कामगिरी साधारण झाली होती. पण शेवटच्या मॅचमध्ये दोघांनीही दमदार खेळ केला. वर्ल्ड कपपूर्वी हे दोघं फॉर्मात परतल्यानं कॅप्टन विराट कोहलची मोठी काळजी दूर झाली आहे. हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) फिटनेसचा प्रश्न अजूनही कायम आहे. त्या परिस्थितीमध्ये सूर्यकुमार यादव हा फिनिशरची भूमिका पार पाडू शकतो. तर इशान किशन हा ओपनिंगसाठी एक चांगला पर्याय आहे. इशान किशन करणार राहुलचा पत्ता कट! T20 वर्ल्ड कपसाठी विराटचा खास प्लॅन टीम इंडियाला आक्रमक सुरूवात आणि दमदार फिनिशिंग करुन देणारे दोन्ही खेळाडू टी20 वर्ल्ड कपपूर्वी फॉर्मात आले आहेत. ही भारतीय फॅन्ससाठी चांगली बातमी असून यामुळे अन्य टीमची डोकेदुखी वाढली आहे.
First published:

Tags: IPL 2021, T20 world cup, Virat kohli

पुढील बातम्या