जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI: टीम इंडियाला आणखी एक धक्का, 5 वा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

IND vs WI: टीम इंडियाला आणखी एक धक्का, 5 वा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

IND vs WI: टीम इंडियाला आणखी एक धक्का, 5 वा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह

भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा पाचवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 3 फेब्रुवारी: भारत-वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा पाचवा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. यापूर्वी बुधवारी झालेल्या कोरोना टेस्टमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) हे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ऑल राऊंडर अक्षर पटेलला (Axar Patel) कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. ‘टाईम्स नाऊ’ नं याबाबतचे वृत्त दिले आहे. अक्षर पटेलनं अद्याप टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश केलेला नाही. त्यापूर्वीच त्याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षरची वेस्ट इंडिज विरूद्धच्या टी20 मालिकेसाठीच निवड झालेली आहे. तो वन-डे टीमचा सदस्य नाही. अक्षरला दुखापतीमुळे यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाता आले नव्हते. त्यानंतर आता कोरोनाची लागण झाल्याने आगामी मालिकेतील त्याचा सहभाग अनिश्चित झाला आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव होताच संपूर्ण टीम सध्या आयसोलेशनमध्ये गेली आहे. ज्या सदस्यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्यांना हॉटेलमधील दुसऱ्या मजल्यावर शिफ्ट करण्यात आले आहे. तसेच आज (गुरूवार) होणारे प्रॅक्टीस सेशन रद्द करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आज सर्व खेळाडूंची पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट होणार आहे. यामध्ये पुन्हा काही जणांना कोरोनाची लागण झाली तर वेळापत्रक बदलण्यात येईल. IND vs WI: रोहित-द्रविडची अडचण ‘हा’ खेळाडू दूर करणार, टीममधील भूमिकेत होणार बदल भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. 16, 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी हे सामने कोलकातामध्ये होणार आहेत. टी20 मालिकेतील भारतीय टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूर ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर , मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात