मुंबई, 3 फेब्रुवारी: भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेला रविवारी सुरूवात होत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय टीमला मोठा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), शिखर धवन (Shikhar Dhawan), ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि नवदीप सैनी (Navdeep Saini) या 4 जणांना कोरनाची लागण झाली आहे. त्यातच केएल राहुल (KL Rahul) पहिली वन-डे खेळणार नाही. त्यामुळे रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या जोडीची डोकेदुखी वाढली आहे.
रविवारी होणाऱ्या पहिल्या वन-डेसाठी रोहितचा जोडीदार कोण हा प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर आहे. रोहित-द्रविड जोडीची ही अडचण व्यकंटेश अय्यर (Venkatesh Iyer) दूर करू शकतो. अय्यरनं आयपीएल 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी ओपनिंग केली होती. आयपीएलमधील जबरदस्त कामगिरीनंतरच अय्यरची टीम इंडियात निवड झाली.
अय्यरकडे सध्या हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. भारतामध्ये झालेल्या न्यूझीलंड विरूद्धच्या टी20 मालिकेत अय्यरला पदार्पणाची संधी मिळाली. त्यानंतर तो भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील वन-डे मालिकेत देखील खेळला. टीम मॅनेजमेंटनं यापूर्वी त्याच्यावर फिनिशरची जबाबदारी दिली होती. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीमध्येही अय्यरला मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यास सांगितले होते. आता भारतीय टीमवर कोरोना अटॅक झाल्यानं अय्यरला पुन्हा टीम इंडियाकडून ओपनिंगची भूमिका मिळू शकते.
IND vs WI: भारत-वेस्ट इंडिज सीरिजबद्दल मोठं अपडेट ...तर वेळापत्रकात बदल होणार
टीम इंडियामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून मयांक अग्रवालाचा समावेश करण्यात आला आहे. मयांक भारतीय टेस्ट टीमचा ओपनर आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून देखील तो ओपनर म्हणूनच खेळतो. त्यामुळे मयांकच्या रूपाने आणखी एक पर्याय टीम मॅनेजमेंटसमोर आहे.
पहिल्या वन-डेसाठी संभाव्य Playing 11 : रोहित शर्मा, व्यंकटेश अय्यर, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, युजवेंद्र चहल मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Shikhar dhavan, Shreyas iyer, Team india, West indies