मुंबई, 17 फेब्रुवारी : भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात झालेल्या पहिल्या टी20 मॅचमध्ये टीम इंडियानं 6 विकेट्सनं विजय मिळवला. वेस्ट इंडिजचा भारत दौऱ्यावरील हा सलग चौथा पराभव आहे. कोलकातामधील इडन गार्डनवर बुधवारी झालेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमचं सुरूवातीपासूनच वर्चस्व होतं. पण, या मॅचमध्ये घडलेल्या 2 घटनांमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढले आहे.
वेस्ट इंडिजचा कॅप्टन कायरन पोलार्डनं (Kieron Pollard) या मॅचमध्ये 24 रन काढले. त्याच्या या खेळीच्या दरम्यान 2 भारतीय खेळाडू जखमी झाले. पोलार्डनं 17 व्या ओव्हरला लाँग ऑनच्या दिशेने एक वेगवान शॉट लगावला. तिथं उभ्या असलेल्या व्यंकटेश अय्यरनं (Venkatesh Iyer) तो शॉट अडवण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. अय्यरच्या हाताला लागून बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेर गेला. यावेळी अय्यरला चांगल्याच वेदना झाल्या होत्या.
वेस्ट इंडिजच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये फास्ट बॉलर दीपक चहरला (Deepak Chahar) पोलार्डच्या फटकेबाजीचा फटका बसला. भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगवर पोलार्डनं मारलेला फटका चहरनं बांऊड्री लाईनजवळ अडवला. त्यावेळी त्याच्या हाताला जोरात बॉल लागला. त्याने तातडीने मैदान सोडले. चहरनं मॅचमधील त्याचा चार ओव्हरचा कोटा पूर्ण केला नाही. त्याने फक्त 3 ओव्हर्स बॉलिंग केली.
IND vs WI 1st T20 : रोहित-सूर्याचं आक्रमण, भारताने वेस्ट इंडिजला धुतलं!
व्यंकटेश अय्यर नंतर बॅटींगला आला. त्याने 13 बॉलमध्ये 24 रन केले. या दोन्ही खेळाडूंच्या दुखापतीबाबत बीसीसीआयकडून अद्याप कोणतेही अपडेट आलेले नाही. पीटीआयच्या बातमीनुसार या दोन्ही खेळाडूंचे स्कॅन करण्यात येईल त्यानंतरच ते उर्वरित सीरिजमध्ये खेळणार की नाही? याबाबतचा निर्णय होईल. या सीरिजमधील दुसरी मॅच 18 तर तिसरी मॅच 20 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kieron pollard, Team india, West indies