जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs WI 1st T20 : रोहित-सूर्याचं आक्रमण, भारताने वेस्ट इंडिजला धुतलं!

IND vs WI 1st T20 : रोहित-सूर्याचं आक्रमण, भारताने वेस्ट इंडिजला धुतलं!

IND vs WI 1st T20 : रोहित-सूर्याचं आक्रमण, भारताने वेस्ट इंडिजला धुतलं!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs West Indies 1st T20) 6 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 158 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 18.5 ओव्हरमध्येच 4 विकेट गमावून केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 16 फेब्रुवारी : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs West Indies 1st T20) 6 विकेटने दणदणीत विजय झाला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या 158 रनच्या आव्हानाचा पाठलाग भारताने 18.5 ओव्हरमध्येच 4 विकेट गमावून केला. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) 18 बॉलमध्ये 34 रनवर तर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) 13 बॉलमध्ये 24 रनवर नाबाद राहिला. रोहित शर्माने (Rohit Sharma) 19 बॉलमध्ये केले 40 रन केले. इशान किशन (Ishan Kishan) 42 बॉलमध्ये 35 रन करून आऊट झाला, तर विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा अपयशी ठरला. फॅबियन एलनने 17 रनवर विराटला आऊट केलं. वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेसला सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर शेल्डन कॉट्रेल आणि फॅबियन एलन यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय बॉलर्सनी वेस्ट इंडिजला 20 ओव्हरमध्ये 157/7 रनवर रोखलं. निकोलस पूरनने (Nicholas Pooran) सर्वाधिक 61 रन केले. पदार्पण करणाऱ्या रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) आणि हर्षल पटेलने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या, तर भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि दीपक चहरला एक-एक विकेट घेण्यात यश आलं. या विजयासह भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. सीरिजची दुसरी टी-20 शुक्रवारी आणि तिसरी टी-20 रविवारी होणार आहे. कोरोना व्हायरस आणि बायो-बबलमुळे तिन्ही सामने कोलकात्याच्या इडन गार्डनवरच होणार आहेत. याआधी झालेल्या वनडे सीरिजमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 3-0 ने पराभव केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात