कानपूर, 25 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये पहिली टेस्ट मॅच सुरू आहे. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सेशनवर न्यूझीलंडच्या बॉलर्सनी वर्चस्व गाजवलं आहे. पहिल्या सेशनमध्ये एक विकेट्स घेणाऱ्या पाहुण्या टीमच्या बॉलर्सनी दुसऱ्या सेशनमध्ये टीम इंडियाला तीन हादरे दिले. शुभमन गिल (52) आणि चेतेश्वर पुजारा (13) यांना आऊट केल्यानंतर कॅप्टन अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) कायले जेमिसननं (Kyle Jamieson) आऊट करत टीम इंडियाला मोठा धक्का दिला आहे. पहिल्या दिवसाच्या लंच सेशनपर्यंत गिल आणि पुजारा ही जोडी मैदानात होती. लंचनंतर हे दोघेही झटपट आऊट झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं या टेस्टमध्ये पदार्पण करणारा मुंबईकर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सोबत इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. ही मुंबईकर जोडी मोठी पार्टनरशिप करणार असं वाटत असतानाच जेमीसननं रहाणेला आऊट केले. आधी दिलासा आणि नंतर निराशा जेमीसननं टाकलेली 50 वी ओव्हर चांगलीच नाट्यमय ठरली. त्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर रहाणे विकेट किपरकडं कॅच देऊन आऊट झाल्याचा निर्णय अंपायरनं दिला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) रहाणे जेमीसनच्या बॉलिंगवर याच पद्धतीनं आऊट झाला होता. पण रहाणेनं या निर्णायवर अपिल करत तात्काळ DRS घेतला. त्यामध्ये तो नॉट आऊट असल्याचं स्पष्ट झालं. रहाणेला या DRS चा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. अगदी पुढच्याच बॉलवर जेमीसननं त्याला बोल्ड केलं. रहाणेनं 35 रन काढले.
Rahane chops one on 💔
— Delhi Capitals (@DelhiCapitals) November 25, 2021
Moments after a successful review from Jinks, he gets out after playing one onto his stumps.
A well made 3⃣5️⃣ that included some crisp cover drives sadly comes to an end 😢#INDvNZ
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन आहे. रहाणेनं सकाळी टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. या टीममध्ये टीम इंडियाकडून मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) पदार्पण केले आहे. न्यूझीलंडची टीम भारतामध्ये गेल्या 33 वर्षात एकही टेस्ट मॅच जिंकलेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप राखण्यासाठीची न्यूझीलंडची मोहीम या टेस्टपासून सुरू होत आहे. टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये न्यूझीलंड टीम इंडियाला धक्का देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.