जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ: पहिल्या टेस्टमध्ये विराटच्या जागेवर खेळणार 'हा' मुंबईकर, अजिंक्य रहाणेनं केलं जाहीर

IND vs NZ: पहिल्या टेस्टमध्ये विराटच्या जागेवर खेळणार 'हा' मुंबईकर, अजिंक्य रहाणेनं केलं जाहीर

IND vs NZ: पहिल्या टेस्टमध्ये विराटच्या जागेवर खेळणार 'हा' मुंबईकर, अजिंक्य रहाणेनं केलं जाहीर

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टेस्ट गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये कोणता मुंबईकर खेळणार हे कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) जाहीर केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कानपूर, 24 नोव्हेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिली टेस्ट गुरुवारपासून कानपूरमध्ये सुरू होणार आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे प्रमुख बॅटर कानपूर टेस्ट खेळणार नाहीत. तर श्रेयस अय्यर (Shreys Iyer) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या दोन मुंबईकरांचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादवचा टेस्ट टीममध्ये समावेश नव्हता. पण, केएल राहुल (KL Rahul) जखमी झाल्यानं मंगळवारी त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कानपूरमध्ये विराट कोहलीच्या जागेवर श्रेयस आणि सूर्या या दोन मुंबईकरांपैकी कोण खेळणार याची उत्सुकता होती. टीम इंडियाचा कानपूर टेस्टमधील कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) ही उत्सुकता संपवली आहे. कानपूर टेस्टमध्ये अय्यर खेळणार असल्याचं रहाणेनं जाहीर केलं आहे. कानपूर टेस्टच्या आदल्या दिवशी रहाणेनं ही घोषणा केली आहे.टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पहिल्यांदाच मुंबईकर श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) समावेश करण्यात आला आहे. IND vs NZ: कानपूरमध्ये राहुल द्रविडची धूम, पोलिसांपासून फॅन्सपर्यंत सर्वांमध्ये ‘द वॉल’ची क्रेझ श्रेयसनं आजवर 92 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत. यामध्ये त्यानं 52.18 च्या सरासरीनं 4592 रन काढले आहेत. यामध्ये 12 शतक आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे.तर 202 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.टीम इंडियाची मिडल ऑर्डर हा इंग्लंड दौऱ्यात चिंतेचा विषय  होता. मिडल ऑर्डरची ही चिंता दूर करण्यासाठी श्रेयसवर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे यांनी विश्वास दाखवला आहे. टीम इंडियाची संभाव्य Playing 11 : मयांक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात