मुंबई, 18 जानेवारी : वन-डे क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या टीम इंडियाची लढत आता न्यूझीलंडशी होणार आहे. या सीरिजमधील पहिली लढत बुधवारी (18 जानेवारी) होणार आहे. या सीरिजमध्ये आगामी वर्ल्ड कपपूर्वी पाहुण्या टीमची खडतर परीक्षा होणार आहे. त्यांना 34 वर्षांपासून अपूर्ण असलेलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे. ‘पत्रिका’ नं याबाबतचं वृत्त दिलंय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वन-डे सीरिजमधील पहिली मॅच , बुधवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही देशांमधील ही 17 वी वन-डे द्विपक्षीय सीरिज असेल. या आधी या दोन देशांदरम्यान एकूण 16 सीरिज खेळल्या गेल्यात. आता पुन्हा एकदा या दोन्ही टीम आमने-सामने असणार आहेत. दुसरीकडे, या सीरिजपूर्वी भारतीय टीमनं श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता. त्याचवेळी न्यूझीलंडने पाकिस्तानचा 2-1 असा पराभव केलाय. भारताची कामगिरी सरस भारत-न्यूझीलंड या दोन्ही टीममधील शेवटची वन-डे सीरिज काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडमध्ये झाली होती. न्यूझीलंडने त्या सीरिजमध्ये भारताचा 1-0 असा पराभव केला होता. अर्थात त्या सीरिजमध्ये पावसाचा व्यत्यय आला होता. ही सीरिज टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 2022 संपल्यानंतर आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये भारतीय टीमचं नेतृत्व शिखर धवनने केलं होतं. तर, भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत 113 वन-डे मॅच झाल्या आहेत. ज्यामध्ये भारताने 55 आणि न्यूझीलंडने 50 मॅच जिंकल्या आहेत. सात मॅचचा निकाल लागला नाही, तर एक मॅच टाय झाली. रोहित शर्मा कसा बनला ‘हिटमॅन’, कोणी दिलं हे नाव? वनडे सामन्यात डबल सेंचुरी सोबत आहे स्पेशल कनेक्शन न्यूझीलंडची कामगिरी जेमतेम भारतीय भूमीवर वन-डे सीरिज खेळताना न्यूझीलंड टीमची कामगिरी जेमतेम राहिलेली आहे. अद्यापही न्यूझीलंडची टीम भारतीय भूमीवर वन-डे सीरिज जिंकण्याची वाट पाहत आहे. न्यूझीलंडने गेल्या 34 वर्षांत 6 वेळा भारताचा दौरा केलाय. मात्र या टीमला एकदाही वन-डे सीरिज जिंकण्यात यश आलं नाही. 1988-89 मध्ये न्यूझीलंडची टीम प्रथमच भारतामध्ये वन-डे सीरिज खेळण्यासाठी आली होती. दिलीप वेंगसरकर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमनं त्या सीरिजमध्ये चारही सामने जिंकले होते. यानंतर, वर्ष 1995 मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने पाच मॅचची सीरिज 3-2 ने जिंकली. चार वर्षांनंतर 1999 मध्ये सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारतानं न्यूझीलंडचा 3-2 असा पराभव केला. चक्क आयसीसीनं केली मोठी गडबड! अवघ्या 2 तासासाठी टीम इंडिया बनली नंबर वन प्रदीर्घ कालावधीनंतर न्यूझीलंडने 2010 मध्ये वन-डे सीरिज खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. त्या पाच मॅचच्या सीरिजमध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं न्यूझीलंडचा पराभव केला. 2016 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आणि 2017 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंडला वन-डे सीरिजमध्ये पराभूत केलं. भारतीय भूमीवर न्यूझीलंडची सर्वोत्तम कामगिरी 2003-04 मध्ये झाली. तेव्हा न्यूझीलंडच्या टीमनं टीव्हीएस कपसाठी झालेल्या तिरंगी सीरिजमध्ये फायनल गाठली होती. मात्र, फायनलमध्ये न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.