मुंबई, 5 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेली टेस्ट ही न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलच्या (Ajaz Patel) आयुष्यभर लक्षात राहणार आहे. एजाझनं पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या. एजाजनं पहिल्या दिवशी 4 तर दुसऱ्या दिवशी 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर एजाझनं दुसऱ्या इनिंगमध्येही टीम इंडियाला धक्के दिले आहे. मुंबई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियानं बिनबाद 69 या स्कोअरवरुन पुढे खेळण्यास सुरूवात केली. मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या जोडीनं सकाळच्या सेशनमध्ये आत्मविश्वासानं खेळण्यास सुरूवात केली. न्यूझीलंडच्या फास्ट बॉलर्सना त्यांनी दाद दिली नाही. पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावलेल्या मयंकने या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावले. ओपनिंग जोडीनं पहिल्या विकेट्ससाठी शतकी भागिदारी केली. एजाझनेच ही जोडी फोडली. त्याने मयंकला 62 रनवर आऊट केले. मयांकची विकेट घेतल्यानंतर एजाझने टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला. त्याने न्यूझीलंडच्या मार्गातील पुजाराचा अडथळा दूर केला. मुंबई टेस्टमधील टीम इंडियाची ही 12 वी विकेट होती. विशेष म्हणजे सर्व 12 विकेट्स एजाजने घेतल्या आहेत. पुजाराचे अर्धशतक फक्त 3 रनने हुकले. खराब फॉर्ममध्ये रडावर असलेला पुजारा पहिल्या इनिंगमध्ये शून्यावर आऊट झाला होता. त्यानंतर या इनिंगमध्ये त्यानं केलेली खेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील त्याच्या निवडीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
12 in 12 for Ajaz Patel!
— ICC (@ICC) December 5, 2021
Cheteshwar Pujara goes for 47.#WTC23 | #INDvNZ | https://t.co/EdvFj8QtKD pic.twitter.com/YQtQISHuug
एजाज तिसरा बॉलर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणारा एजाज हा तिसरा बॉलर ठरला आहे. सर्वप्रथम जिम लेकर यांनी 1956 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकाच इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 43 वर्षांनी म्हणजेच 1999 साली अनिल कुंबळेने पाकिस्तान विरुद्ध दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर या विक्रमाची बरोबरी केली. कुंबळेच्या रेकॉर्डनंतर 23 वर्षांनी पटेलनं या ऐतिहासिक कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. एजाझ पटेलच्या ऐतिहासिक कामगिरीत कुंबळेचा हात! वाचा Perfect 10 चं ‘जम्बो कनेक्शन’