मुंबई, 5 डिसेंबर: न्यूझीलंडचा स्पिनर एजाझ पटेलसाठी (Ajaz Patel) शनिवारचा दिवस सर्वात खास होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टमध्ये त्यानं एकाच इनिंगमध्ये सर्व 10 विकेट्स घेतल्या. जिम लेकर (1956) आणि अनिल कुंबळे (1999) या दोन बॉलर्सनंतर ही कामगिरी करणारा एजाझ हा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील तिसराच बॉलर ठरला आहे. अनिल कुंबळे (Anil Kumble) यांनीही खास ट्विट करत एजाझचं अभिनंदन केले. अनिल कुंबळेनं अभिनंदन केल्यानं एजाझ चांगलाच खूश झाला. त्यानं मॅचनंतर बोलताना या कामगिरीचे कुंबळे कनेक्शन सांगितले. ‘मला त्यांनी 10 विकेट्स घेतलेलं लक्षात आहे. मी अनेकदा त्या मॅचच्या हायलाईट्स पाहिल्या आहेत. या कामगिरीमुळे त्यांची बरोबरी केल्यानं मी स्वत:ला भाग्यवान समजतो. टीम इंडियाच्या इनिंग दरम्यान कधीही 10 विकेट्स आपण घेऊ शकतो याचा विचार मनात आला नाही. या रेकॉर्डसाठी खूप काम करावं लागेल हे मला माहिती होते. मला ऑनर्स बोर्डमध्ये झळकण्याची इच्छा होती. पण, हा रेकॉर्ड खूपच खास आहे. सर्वोत्तम दिवस एजाझनं पुढे सांगितलं की, ‘माझ्या क्रिकेट कारकिर्दीमधील हा एक सर्वोत्तम दिवसांपैकी एक आहे. मी मैदानाच्या बाहेर आलो तेव्हा खूप साऱ्या गोष्टी बदलल्या होत्या. हा माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी आणि कुटंबासाठी खूप खास दिवस आहे. मी या दिवसासाठी देवाचा आभारी आहे. पण, टीमचा विचार केला तर आम्ही अडचणीत आहोत. आम्हाला धैर्याने सामना करावा लागेल. मॅचचं चित्र बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. रोहित शर्माला टेस्ट टीमचा कॅप्टन करण्याची तयारी! वाचा BCCI चा खास प्लॅन एजाझनं 10 विकेट्स घेतल्यानं टीम इंडियाची पहिली इनिंग 325 रनवर संपुष्टात आली होती. त्याला उत्तर देताना न्यूझीलंडची संपूर्ण टीम फक्त 62 रनवर ऑल आऊट झाली. टेस्ट क्रिकेटमध्ये न्यूझीलंडची ही टीम इंडिया विरुद्धची सर्वात कमी धावसंख्या आहे. टीम इंडियानं पहिल्या इनिंगमध्ये तब्बल 263 रनची आघाडी घेतली. त्यानंतरही न्यूझीलंडवर फॉलो ऑन न लादण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटनं घेतला . टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस बिनबाद 69 रन केले आहेत. मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) 38 तर चेतेश्वर पुजारा (29) रन काढून नाबाद आहे. टीम इंडियाकडे सध्या 332 रनची आघाडी असून मुंबई टेस्टचे आणखी तीन दिवस बाकी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.