मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ 3rd T20 LIVE Streaming: तिसरी T20 कधी आणि कुठे पाहता येणार?

IND vs NZ 3rd T20 LIVE Streaming: तिसरी T20 कधी आणि कुठे पाहता येणार?

रोहित शर्माच्या (Rohit Sharama) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियानं ही मालिका यापूर्वी जिंकली आहे. आता तिसरी मॅच जिंकून क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

  • Published by:  News18 Desk

कोलकाता, 21 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील तिसरा टी20 सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर रविवारी होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharama) कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियानं ही मालिका यापूर्वी जिंकली आहे. आता तिसरी मॅच जिंकून क्लीन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. यापूर्वी मागच्या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेली 5 टी20 सामन्यांची मालिका टीम इंडियानं 5-0 नं जिंकली होती.

कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर ही मॅच होत आहे. हे रोहित शर्माचं आवडतं मैदान आहे. याच मैदानात रोहितनं वन-डे क्रिकेटमध्ये 264 रनची ऐतिहासिक खेळी केली होती. आता कॅप्टन म्हणून न्यूझीलंडला 3-0 असं हरवण्याची मोठी संधी रोहितला आहे. या मॅचसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल होऊ शकतात. ऋतुराज गायकवाड, इशान किशन आणि आवेश खानला खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.

किती वाजता सुरू होणार मॅच?

भारत विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरी टी20 21 नोव्हेंबर रोजी रविवारी कोलकातामध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर टॉस 6.30 वाजता होईल.

कुठे होणार लाईव्ह प्रसारण?

या मॅचचं लाईव्ह प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवरही पाहता येणार आहे.

टॉस हरल्यानंतर ड्यू प्लेसिसनं दिला ख्रिस गेलला धक्का, पाहा VIDEO

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, आर.अश्विन, युझवेंद्र चहल, दीपक चहर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान किशन, ऋतुराज गायकवाड, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल आणि हर्षल पटेल

न्यूझीलंडची टीम:  टीम साऊदी (कॅप्टन), ट्रेन्ट बोल्ट, मार्टीन गप्टील, डॅरेल मिचेल, टीम सिफर्ट, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, रचिन रविंद्र, मिचेल स्टँनर, लॉकी फर्ग्युसन, अ‍ॅडम मिल्ने, मार्क चॅपमन, आणि इश सोधी

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india