मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

टॉस हरल्यानंतर ड्यू प्लेसिसनं दिला ख्रिस गेलला धक्का, पाहा VIDEO

टॉस हरल्यानंतर ड्यू प्लेसिसनं दिला ख्रिस गेलला धक्का, पाहा VIDEO

अबू धाबी टी10 लीगचा (Abu Dhabi T10 League) थरार सुरू झाला आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून चांगले सामने पाहयला मिळत आहेत. या स्पर्धेत शनिवारी घडलेला एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 21 नोव्हेंबर: अबू धाबी टी10 लीगचा (Abu Dhabi T10 League) थरार सुरू झाला आहे. या स्पर्धेच्या सुरुवातीपासून चांगले सामने पाहयला मिळत आहेत. शनिवारी झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोननं (Liam Livingstone) आक्रमक बॅटींग करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानं 23 बॉलमध्ये 68 रन काढत अबू धाबीच्या टीमला मोठा विजय मिळवून दिला. शनिवारी लिविंगस्टोनच्या फटकेबाजीबरोबरच ख्रिस गेल (Chris Gayle), ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) आणि फाफ ड्यू प्लेलिस (Faf Du Plessis) यांच्यातील एक घटना गाजली.

अबू धाबी विरुद्ध नॉर्दन वॉरियर्स यांच्यातील मॅचनंतर लगेच ड्वेन ब्राव्होची दिल्ली बुल्स आणि फाफ ड्यू प्लेसिसच्या बांगला टायगर्स यांच्यात मॅच होणार होती. या मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज होते.

त्याचवेळी अबू धाबी टीमचा ख्रिस गेल तिथं आला. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्वान टॉसची कॉमेंट्री करत होता. त्यानं मॅच रेफ्रीच्या ऐवजी गेलला टॉस करण्यास सांगितलं. स्वाननं युनिव्हर्स बॉसला मॅच रेफ्रीची जबाबदारी दिली.

गेलनं टॉस केला. हा टॉस गेलचा मित्र ब्राव्होनं जिंकला. त्यावेळी दोघांनीही त्याचा आनंद साजरा केला. त्याचवेळी ड्यू प्लेसीनं केलेल्या कृतीमुळे ही घटना आणखी मजेदार बनली. गेलनं ड्यू प्लेसीची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यानं मजेत गेलला एका बाजूला ढकलले आणि टॉस पुन्हा करण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मॅचमध्ये दिल्ली बुल्सनं 6 विकेट्सनं विजय मिळवला.

IND vs NZ: IPL गाजवणाऱ्या खेळाडूंना मिळणार टीम इंडियात संधी! अशी असेल Playing11

First published:

Tags: Cricket news, Live video viral