कानपूर, 27 नोव्हेंबर: कानपूर टेस्टमध्ये शतक झळकाल्यानं श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या चर्चेत आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकावणाऱ्या श्रेयसचं सध्या सर्वजण कौतुक करत आहेत. श्रेयसच्या या यशात एका मुंबईकरचा मोठा वाटा आहे. स्वत: श्रेयसनंच हा खुलासा केला आहे. हा मुंबईकर खेळाडू आहे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). कानपूर टेस्टमध्ये पदार्पण करण्यासाठी श्रेयस आणि सूर्यामध्ये स्पर्धा होती. यामध्ये श्रेयसला संधी मिळाली. त्यानंतरही सूर्यानं त्याच्या मुंबईकर सहकाऱ्याचा उत्साह वाढवला. कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सूर्यकुमार यादवनं बीसीसीआय टीव्हीसाठी श्रेयसची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये श्रेयसनं मुंबई क्रिकेटमधील सुरुवातीच्या दिवसात सूर्यानं दिलेल्या पाठिंब्याचा उल्लेख केला आहे. बीसीसीआयनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रेयसनं सूर्याची मैत्री आणि कानपूर कनेक्शनचा (Kanpur Stadium) उल्लेख केला आहे. श्रेयसच्या पहिल्या रणजी सिझनमध्ये सूर्या मुंबईचा कॅप्टन होता. पहिल्या चार मॅचनंतरही पाठिंबा दिल्याबद्दल त्याने सूर्याचे आभार मानले. चार मॅचनंतर मला वगळलं जाईल असं वाटलं होतं, पण त्याने मला पाठिंबा दिला.
He gave Shreyas a hug 🤗, he clapped for him 👏, he was one of the happiest when his mate scored a hundred 😊.
— BCCI (@BCCI) November 26, 2021
This interview of @ShreyasIyer15 with @surya_14kumar is all heart. 👍 👍 - By @28anand
Full interview 🎥 🔽 #TeamIndia #INDvNZ @Paytm https://t.co/CR0rOtTXiu pic.twitter.com/y1cFU18qB5
त्या मॅचमध्ये मुंबईनं 5 विकेट्स झटपट गमावल्या होत्या. त्यानंतर श्रेयसनं तळच्या बॅटर्ससोबत 150 रनची पार्टनरशिप केली आणि मुंबईची स्थिती भक्कम केली. हे मैदान माझ्यासाठी नेहमीच खास आहे. मी या मैदानात आयपीएलमध्येही 93 रन काढले होते, अशी आठवण श्रेयसनं यावेळी सांगितली. IND vs NZ: … तर टीम इंडिया DRS साठी नकार देईल! न्यूझीलंडच्या ऑल राऊंडरनं लगावला टोला मी पहिल्याच टेस्टमध्ये शतक झळकावलं आहे, याचा अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही. मला अनेक मेसेज येत आहे. सर्वांनीच ही एक मोठी उपलब्धी असल्याचं सांगितलं आहे. हे सर्व मेसेज वाचून मला मुंबईतील क्रिकेटचे दिवस आठवले. हा एक खूप छान अनुभव आहे.’ असे श्रेयसने या मॅचनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.