कानपूर, 27 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील कानपूर टेस्टच्या दुसऱ्या दिवसावर न्यूझीलंडनं वर्चस्व गाजवलं. टीम साऊदीनं (Tim Southee) 5 विकेट्स घेत टीम इंडियाला 345 रनवर रोखलं. त्यानंतर दिवसअखेर न्यूझीलंडनं एकही विकेट न गमावता 129 रन करत चोख उत्तर दिलं आहे. टॉम लॅथम (Tom Latham) आणि विल यंग (Will Young) या दोघांनी अर्धशतक झळकावत भक्कम सुरुवात केली आहे. न्यूझीलंडचा ओपनिंग बॅटर टॉम लॅथम याला यावेळी नशिबाची जोरदार साथ मिळाली. त्याला अंपायरनं तब्बल 3 वेळा आऊट दिलं, पण तीन्ही वेळेस त्यानं DRS च्या माध्यमातून अंपायरला तो निर्णय बदलण्यास भाग पाडले. यापूर्वी इंग्लंडच्या मोईन अलीनं बांगलादेश विरुद्ध अंपायरला एकाच इनिंगमध्ये 3 वेळा निर्णय बदलायला लावला होता. थर्ड अंपायरनं DRS च्या माध्यमातून केलेल्या मदतीमुळे लॅथम दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 50 रन काढून नाबाद आहे. न्यूझीलंडचा ऑल राऊंडर जेम्स नीशम (James Neesham) यानं या अंपायरिंगवर टोला लगावला आहे. लॅथमनं आता शतक झळकावलं तर टीम इंडिया त्यांच्या देशात DRS चा वापर करण्यास नकार देऊ शकतं, असं ट्विट नीशमनं केलं आहे.
If Tommy Latham gets a ton here India might go back to refusing to use DRS at home 😂
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) November 26, 2021
न्यूझीलंडनं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस विल यंग आणि टॉम लॅथमच्या पार्टनरशिपच्या जोरावर भक्कम सुरुवात केली आहे. टीम इंडियाकडे अद्याप 216 रनची आघाडी आहे. कानपूर टेस्टवर पकड मिळवण्यासाठी भारतीय बॉलर्सना तिसऱ्या दिवशी झटपट विकेट्स घ्याव्या लागतील. दुसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्सनी साफ निराशा केली. एकाही बॉलरचा विकेट घेण्यात शुक्रवारी अपयश आले. कानपूरचे पिच तिसऱ्या दिवसापासून स्पिनर्सला मदत करेल अशी आशा आहे. त्याचा फायदा टीम इंडियाला शनिवारी होऊ शकतो. IND vs NZ: श्रेयस अय्यरनं शतक झळकात पूर्ण केली अट, आता घरी जेवायला येणार खास पाहुणा