Home /News /sport /

IND vs NZ: विराटसाठी मुंबई टेस्टमध्ये 'या' खेळाडूला वगळणार, वाचा द्रविडच्या मनात चाललंय काय?

IND vs NZ: विराटसाठी मुंबई टेस्टमध्ये 'या' खेळाडूला वगळणार, वाचा द्रविडच्या मनात चाललंय काय?

टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मुंबई टेस्टसाठी विश्रांतीनंतर परत येतोय. विराटला खेळवण्यासाठी एका बॅटरला वगळणे भाग आहे.

    मुंबई, 2 डिसेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्या टेस्ट सीरिजमधील (India vs New Zealand Test Series) दुसरी आणि शेवटची टेस्ट शुक्रवारी मुंबईत सुरू होत आहे. कानपूरमध्ये विजय थोडक्यात निसटल्यानंतर ही सीरिज जिंकण्यासाठी टीम इंडियाला मुंबईत जिंकणे आवश्यक आहे. टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) मुंबई टेस्टसाठी विश्रांतीनंतर परत येतोय. विराटचा मुंबईतील रेकॉर्ड जबरदस्त आहे. त्याच्या समावेशामुळे भारतीय टीमची बॅटींग ऑर्डर आणखी मजबूत होणार आहे. त्याचवेळी विराटला खेळवण्यासाठा कुणाला वगळायचं हा प्रश्न टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) समोर आहे. विराट कोहलीला खेळवण्यासाठी एका बॅटरला वगळणे भाग आहे. तो बॅटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) असेल अशी चर्चा होती. टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन असलेल्या रहाणेचा फॉर्म सध्या हरपला आहे. कानपूर टेस्टमध्येही तो फार काही करू शकला नव्हता. पण राहुल द्रविड आणि बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विराटला खेळवण्यासाठी अजिंक्य रहाणेला नाही तर ओपनर मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) याला वगळले जाऊ शकते, असं वृत्त 'पीटीआय' नं दिलं आहे. टीम इंडियाचा विकेट किपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याच्या खेळण्याबाबतचा निर्णय ऐनवेळी घेतला जाईल, असे बॉलिंग कोच म्हांब्रे यांनी सांगितले आहे. पहिल्या टेस्टच्या वेळी साहा याची मान दुखावली होती. त्यामुळे बराच काळ श्रीकर भरतनं विकेट किपिंग केले. भरत विकेट किपरसह ओपनिंग बॅटरही आहे. त्याला मुंबई टेस्टमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकते. IND vs NZ: तयारीसाठी मिळाले फक्त 12 मिनिटे! टीम इंडियाच्या खेळाडूनं सांगितला 'तो'अनुभव VIDEO मयांकनं कानपूर टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये 13 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 17 रन काढले होते. त्याला टीममधून वगळले तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघंही प्लईंग 11 मध्ये खेळू शकतात. मुंबई टेस्टमध्ये या अनुभवी बॅटरना पुन्हा एकदा संधी देण्याचा द्रविडचा विचार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: New zealand, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या