कानपूर, 28 नोव्हेंबर: कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. विकेट किपर ऋद्धीमान साहाची (Wriddhiman Saha) मान दुखावली. त्यामुळे टीम मॅनेजमेंट तातडीनं केएस भरतला (KS Bharat) बदली विकेटकिपर म्हणून मैदानात पाठवावं लागलं. भरतनं ऐनवेळी मिळालेल्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. त्यानं तिसऱ्या दिवशी दमदार खेळ करत 2 कॅच घेतले आणि एक स्टंपिग केले.
भरतनं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बीसीसीआय टीव्हीवर आर. अश्विन (R. Ashwin) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्याशी चर्चा केली. यावेळी आपल्याला मैदानात उतरण्याची तयारी करण्यासाठी फक्त 12 मिनिटे मिळाली असा खुलासा केला. 'मी सकाळी माझी नेहमीची दिनचर्या करत होते. त्यावेळी मला अचानक मॅचसाठी तयार होण्याची सूचना मिळाली. माझ्याकडं तयारीसाठी फक्त 12 मिनिटे होती.' असे भरतने सांगितले.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये आंध्र प्रदेशकडून खेळणाऱ्या भरतनं विल यंग (Will Young) चा सुंदर कॅच पकडला. त्या कॅचबद्दल भरत म्हणाला की, 'बॉल खाली राहत आहे, हे मला माहिती होतं, त्यामुळे मी विकेटकिपिंगमध्ये सतत बदल करत होतो.'
अक्षर पटेलनंही यावेळी भरतनं केलेली कामगिरी सोपी नसल्याचं मान्य केलं. 'प्लेईंग 11 मध्ये समावेश नसताना अचानक खेळण्यासाठी सज्ज होण्याची सूचना मिळते तेव्हा खेळणे सोपे नसते. साहाची मान अवघडली तेव्हा भरत वॉर्मअप करत होता. त्याला मॅचच्या 10 मिनिटे आधीा खेळण्यास सांगितले. त्याने चांगली कामगिरी केल्याचं सर्वांनी पाहिले. येत्या काळात तो आणखी चांगली कामगिरी करेल' असा विश्वास अक्षरनं व्यक्त केला.
Special: @ashwinravi99 takes centre stage to interview Mr. Fifer @akshar2026 & Super sub @KonaBharat. 👏
You don't want to miss this rendezvous with the #TeamIndia trio after Day 3 of the Kanpur Test. 👌- By @28anand Full interview 🎥 ⬇️ #INDvNZ @Paytm https://t.co/KAycXfmiJG pic.twitter.com/jZcAmU41Nf — BCCI (@BCCI) November 27, 2021
भरतचं प्रथम श्रेणी करियर
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये श्रीकर भरतने 78 सामन्यांमध्ये 37.24 च्या स्ट्राईक रेटने 4.283 रन केले, यामध्ये 9 शतकं आणि 23 अर्धशतकांचा समावेश आहे. 28 वर्षांच्या भरतने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 270 कॅच आणि 31 स्टम्पिंग केले आहेत. नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये भरतने 5 मॅचमध्ये 131 रन केले. जम्मू काश्मीरविरुद्ध त्याने 70 रनची आणि झारखंडविरुद्ध 48 रनची खेळी केली.
IND vs NZ: पदार्पणापूर्वीच भरतची कमाल, पण त्याच्या नावावर होणार का रेकॉर्डची नोंद? वाचा सविस्तर
आयपीएलच्या या मोसमात भरत आरसीबीकडून खेळला होता. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 78 रनची उल्लेखनीय खेळी केली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Team india