कानपूर, 28 नोव्हेंबर: भारतीय पिचवर विकेट्स घेणे जगभरातील अनेक फास्ट बॉलर्सना जमत नाही. भारतामधील पाटा पिचवर विकेट घेण्यासाठी त्यांना चांगलाच घाम गाळावा लागतो. न्यूझीलंडचा एक बॉलर मात्र याला अपवाद आहे. त्यानं कानपूरमधील स्पिन बॉलर्सना मदत करणाऱ्या पिचवर देखील भेदक मारा करत टीम इंडियाला अडचणीत आले आहे. टीम इंडिया विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये 50 विकेट्स पूर्ण करणारा तो न्यूझीलंडचा दुसरा बॉलर ठरला आहे. न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदीनं (Tim Southee) पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानं शनिवारी मयांक अग्रवालला (Mayank Agarwal) आऊट करत भारताविरुद्ध 50 टेस्ट विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यानंतर त्यानं लगेच रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आऊट करत एकूण विकेट्सची संख्या 51 वर नेली. न्यूझीलंडकडून भारताविरुद्ध रिचर्ड हॅडलीनं सर्वाधिक 65 विकेट्स घेतल्या आहेत.
NZ bowlers with most Test Wickets against India
— ComeOn Cricket 🏏🇮🇳 (@ComeOnCricket) November 28, 2021
65 - Richard Hadlee
50 - Tim Southee*
41 - Trent Boult
40 - Daniel Vettori#INDvsNZ
साऊदीचा संपूर्ण आशिया खंडात दमदार रेकॉर्ड आहे. त्यानं आशियाई पिचवर 23.22 च्या सरासरीनं 47 विकेट्स घेतल्या आहेत. तर न्यूझीलंडमध्ये त्याची सरासरी 26.89 आहे. याचाच अर्थ त्याची मायदेशातील पिचपेक्षा आशिया खंडात चांगली कामगिरी आहे. 2018 नंतर साऊदी सातत्यानं चांगली बॉलिंग करत आहे. 100 पेक्षा जास्त विकेट्स कमी सरासरीनं घेण्याच्या यादीत तो ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. IND vs NZ: 70 मिनिटांत टीम इंडियाची दाणादाण, कानपूर टेस्टमध्ये पालटलं चित्र टीम साऊदी पहिल्या इनिंगमध्येही न्यूझीलंडकडून सर्वात यशस्वी बॉलर ठरला होता. त्यानं 69 रन देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. कानपूर टेस्टमध्ये 42 वर्षांनंतर पहिल्यांदाच विदेशी फास्ट बॉलरनं 5 विकेट घेतल्या आहेत.