मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs NZ: 70 मिनिटांत टीम इंडियाची दाणादाण, कानपूर टेस्टमध्ये पालटलं चित्र

IND vs NZ: 70 मिनिटांत टीम इंडियाची दाणादाण, कानपूर टेस्टमध्ये पालटलं चित्र

कानपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडनं टीम इंडियाला जोरदार धक्के दिले (फोटो सौजन्य -@ICC)

कानपूर टेस्टच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडनं टीम इंडियाला जोरदार धक्के दिले (फोटो सौजन्य -@ICC)

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टेस्टच्या चौथ्या दिवशी अवघ्या 70 मिनिटांमध्ये टीम इंडियाला जोरदार धक्के बसले.

कानपूर, 28 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील टेस्टच्या चौथ्या दिवशी टीम इंडियाला जोरदार धक्के बसले. सकाळच्या 70 मिनिटात भारतीय बॅटर्सनी निराशा केली. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी एकापाठोपाठ 4 विकेट्स घेतल्यानं टीम इंडिया अडचणीत आली आहे.

चौथ्या दिवशी सकाळी कायले जेमीसननं पुजाराला सर्वप्रथम आऊट केले. विकेट किपर ब्लंडेलनं पुजाराचा कॅच घेतला. मैदानातील अंपायरनं पुजाराला आऊट दिले नव्हते. या निर्णयाच्या विरोधात न्यूझीलंडलं DRS घेतले. त्यावेळी पुजारा आऊट असल्याचे स्पष्ट झाले.चेतेश्वर पुजारा आऊट झाल्याच्या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला. कॅप्टन अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) तर फक्त 4 रन काढून आऊट झाला. एजाज पटेललं त्याला आऊट केले.

पुजारा आणि रहाणे आऊट झाल्यानंत न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं (Kane Williamson) पहिल्या इनिंगमधील सर्वात यशस्वी बॉलर टीम साऊदीच्या (Tim Southee)  हातामध्ये बॉल दिला. साऊदीनं दुसऱ्याच बॉलवर एक बाजू लावून धरलेल्या मयांक अग्रवालला (Mayank Agarwal) आऊट केले. मयांक 17 रन काढून टॉम लॅथमकडे कॅच देऊन परतला.

साऊदीनं त्याच ओव्हरमध्ये टीम इंडियाचा ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) आऊट करत टीम इंडियाला पाचवा धक्का दिला. साऊदीचा बॉल जडेजाला काही समजण्याच्या आत पॅडला लागला. अंपायरच्या निर्णयाविरुद्ध जडेजानं DRS देखील घेतला पण त्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

टीम इंडियाचा विकेट किपर वृद्धीमान साहा जखमी आहे.त्यामुळे तो बॅटींगला येईल का नाही हे अद्याप अनिश्चित आहे. साहाच्या आधी आर. अश्विन बॅटींगला उतरला आहे. टीम इंडियाला कानपूर टेस्टवर पकड मिळवण्यासाठी किमान 200 रनची आघाडी घेणे आवश्यक आहे.

IND vs NZ: टीम इंडियाचे दिग्गज पुन्हा अपयशी, आता त्यांना वाचवणे द्रविडसाठीही अशक्य

First published:
top videos