कानपूर, 29 नोव्हेंबर : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ सध्या सुरू आहे. पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात भारतीय बॉलर्स झटपट विकेट घेत न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकलतील अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र सकाळच्या सत्रात न्यूझीलंडनं निर्धारानं खेळ करत टीम इंडियाला चांगलेच दमवले आहे.
चौथ्या दिवशी खेळ संपण्यापूर्वी बॅटींगला आलेल्या विल्यम समरविले (William Somerville) नाईट वॉचमनने भारतीय बॉलर्सची चांगलीच परीक्षा घेतली. त्याने टॉम लॅथमच्या (Tom Latham) मदतीने पहिल्या सत्रात किल्ला लढवला. या दोघांना आऊट करण्यासाठी कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) सर्व बॉलर्सचा वापर केला. पण, त्यांनी त्याला दाद दिली नाही. भारतीय बॉलर्सना पाचव्या दिवशी पहिल्या सेशनमध्ये एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाचे टेन्शन वाढले आहे. लंचसाठी खेळ थांबला तेंव्हा न्यूझीलंडने 1 आऊट 79 रन केले आहेत. न्यूझीलंडला ही मॅच जिंकण्यासाठी आणि 204 रनची गरज आहे.
Lunch on day five in Kanpur 🍲
An excellent session for the visitors. #WTC23 | #INDvNZ | https://t.co/9OZPrsh0Tm pic.twitter.com/3PVzidm9cU — ICC (@ICC) November 29, 2021
न्यूझीलंडसाठी खडतर आव्हान
कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी न्यूझीलंडला ऐतिहासिक कामगिरी करावी लागणार आहे. भारतीय पिचवर चौथ्या इनिंगमध्ये टार्गेटचा पाठलाग करणे हे नेहमीच अवघड असते. विशेषत: विदेशी टीमना भारतीय स्पिनर्सचं मोठं आव्हान पार करणे हे नेहमीच कठीण गेले आहे.
मोठी बातमी: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा अपघात, मुलगाही होता सोबत
कानपूर टेस्टमध्ये न्यूझीलंडला मॅच जिंकण्यासाठी 34 वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडावा लागेल. हा रेकॉर्ड आजवर मोडणे अनेक दिग्गज टीमनाही जमलेलं नाही. भारतामध्ये कोणत्याही विदेशी टीमनं आजवर चौथ्या इनिंगमध्ये 276 पेक्षा जास्त टार्गेट यशस्वीपणे पूर्ण केलेले नाही. 1987 साली व्हिव रिचर्डस यांच्या वेस्ट इंडिज टीमनं दिल्ली टेस्टमध्ये 276 रनचे टार्गेट यशस्वी पूर्ण केले होते. या सीरिजमधील दुसरी आणि शेवटची टेस्ट 3 डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india