मुंबई, 29 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नचा (Shane Warne) अपघात झाला आहे. वॉर्न त्याचा मुलगा जॅक्सनसोबत बाईक राईडिंग करत होता. त्यावेळी तो खाली पडला जवळपास 15 मिटरपेक्षा जास्त तो जमिनीवर घासून पुढे गेला. 'सिडनी मॉर्निंग हेरॉल्ड' नं दिलेल्या वृत्तानुसार शेन वॉर्नला दुखापत झाली असून बराच त्रास देखील होत आहे.
या अपघातानंतर वॉर्नला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आपला पाय मोडला असल्याची भीती वॉर्नला होती. मात्र सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अॅशेस सीरिजला (ashes series)8 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरूवात होणार आहे. या सीरिजसाठी शेन वॉर्न कॉमेंट्री करणार आहे.काही दिवसांपूर्वी वॉर्न टीव्ही कलाकार जेसिका पॉवरला अश्लील मेसेज पाठवल्याच्या प्रकरणात चर्चेत आला होता.
ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये सध्या अश्लील मेसेज केल्याचं आणखी एक प्रकरण गाजत आहे. टीम पेनला (Tim Paine) महिला सहकाऱ्याला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवल्याचं प्रकरण सार्वजनिक झाल्यानंतर टेस्ट टीमच्या कॅप्टन पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यानं अॅशेस सीरिजमधूनही नाव मागं घेतलं आहे. पेनच्या या निर्णयामुळे त्याचं क्रिकेट करिअर समाप्त झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
'माझ्या पत्नीला शिव्या देणे बंद करा', WBBL विजेत्या महिला खेळाडूनं सुनावलं
टीम पेनच्या जागी ऑस्ट्रेलियानं पॅट कमिन्सची (Pat Cummins) ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन म्हणून नियुक्ती केली आहे. तो यापूर्वी टेस्ट टीमचा व्हाईस कॅप्टन होता. अनुभवी स्टीव्ह स्मिथची (Steve Smith) व्हाईस कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आला आहे. . कमिन्सच्या रुपाने 1956 नंतर म्हणजे तब्बल 65 वर्षांनी फास्ट बॉलर ऑस्ट्रेलियन टेस्ट टीमचा कॅप्टन बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.