Home /News /sport /

IND vs NZ: अक्षर पटेलचा न्यूझीलंडला 'पंच', दमदार कामगिरीनंतर मानले आयुष्यातील हिरोचे आभार

IND vs NZ: अक्षर पटेलचा न्यूझीलंडला 'पंच', दमदार कामगिरीनंतर मानले आयुष्यातील हिरोचे आभार

न्यूझीलंडला पहिल्या इनिंगमध्ये रोखण्यात अक्षर पटेलची (Axar Patel) भूमिका मोलाची होती. त्यानं 34 ओव्हरमध्ये 62 रन देत 5 विकेट्स घेतल्या. या दमदार कामगिरीनंतर अक्षरनं त्याच्या हिरोचे आभार मानले आहेत.

    कानपूर, 28 नोव्हेंबर: टीम इंडियानं न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या (India vs New Zealand) कानपूर टेस्टमध्ये आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेव्हा भारतीय टीमकडे 63 रनची आघाडी होती. टीम इंडियाच्या 345 रनला उत्तर देताना न्यूझीलंडची टीम 296 रनवर ऑल आऊट झाली. त्यानंतर शनिवारी खेळ संपला तेव्हा भारतीय टीमनं एक आऊट 14 रन केले होते. न्यूझीलंडला पहिल्या इनिंगमध्ये रोखण्यात अक्षर पटेलची (Axar Patel) भूमिका मोलाची होती. त्यानं 34 ओव्हरमध्ये 62 रन देत 5 विकेट्स घेतल्या. या दमदार कामगिरीनंतर अक्षरनं त्याच्या आयुष्यातील हिरोचे स्मरण केले. हे हिरो अन्य कुणी नाहीत तर त्याचे वडील आहेत. अक्षरच्या वडिलांचा शनिवारी वाढदिवस होता. शनिवारी खेळ संपल्यानंतर अक्षरनं वडिलांसाठी खास ट्विट केले. 'नंबर 5... सर्वांचे मेसेजसाठी धन्यवाद. ही कामगिरी माझ्या हिरोसाठी आहे. बाबा, वाढदिवसाच्या शुभेच्छा.' अक्षर पटेलने 4 टेस्टच्या 7 इनिंगमध्ये 10.87 ची सरासरी आणि 30.3 च्या स्ट्राईक रेटने 32 विकेट घेतल्या. यात 5 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि मॅचमध्ये एकदा 10 विकेटचा समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला रविंद्र जडेजाला दुखापत झाल्यामुळे अक्षर पटेलला इंग्लंडविरुद्ध भारतात झालेल्या टेस्ट सीरिजमधून पदार्पणाची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच टेस्ट सीरिजमध्ये अक्षर पटेलने धमाका केला. इंग्लंडविरुद्धच्या 3 टेस्टमध्ये त्याने तब्बल 27 विकेट घेतल्या. आपल्या पहिल्याच टेस्टच्या इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा करिश्माही अक्षर पटेलने केला. IND vs SA: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले... अक्षर पटेलने 38 वनडे आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचही खेळल्या. यात त्याला वनडेमध्ये 45 आणि टी-20 मध्ये 13 विकेट मिळाल्या. आयपीएलमध्ये अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा महत्त्वाचा खेळाडू आहे. आयपीएलच्या पुढच्या मोसमाआधी दिल्लीची टीम अक्षर पटेलला रिटेन करण्याचीही शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Axar patel, Cricket news, New zealand, Team india

    पुढील बातम्या