जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs SA: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

IND vs SA: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

IND vs SA: टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर क्रीडा मंत्र्यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ चा (Covid Omicron variant) प्रसार वेगानं झाल्यानं टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा हा संकटात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट ‘ओमिक्रॉन’ चा (Covid Omicron variant) प्रसार वेगानं झाल्यानं टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा हा संकटात आला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार टीम इंडियात डिसेंबर महिन्यात आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या विषयावर ‘क्रिकेट साऊथ आफ्रिका’ (Cricket South Africa) सोबत चर्चा सुरू असल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं होतं. आता त्यापाठोपाठ केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी या विषयावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI) टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यापूर्वी सरकारचा सल्ला घ्यावा, अशी सूचना ठाकूर यांनी दिली आहे. उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये ते बोलत होते. ‘कोरोनाचा नवा व्हेरिएंट ज्या देशांमध्ये आढळला आहे, तिथं टीम पाठवण्यापूर्वी बीसीसीआयच नाही तर प्रत्येक क्रीडा संघटनेनं सरकारचे मत विचारात घ्यायला हवे. ज्या देशात धोका आहे, तिथं टीम पाठवणे योग्य नाही.’ नियोजित कार्यक्रमानुसार टीम इंडियाची पहिली टेस्ट 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्गमध्ये सुरू होणार आहे. टीम इंडिया ए सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आल्यानंतर बीसीसीआय टीमला परत बोलावेल असं अंदाज व्यक्त केला जात होता. पण ‘इंडिया ए’ ‘टीमचा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. टीम इंडियाला आफ्रिकेत पाठवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी दिली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा उद्रेक, ICC चा ‘वर्ल्ड कप’ स्थगित करण्याचा निर्णय ‘सध्या या दौऱ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होईल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून क्रिकेट साऊथ आफ्रिकेशी (Cricket South Africa) संपर्कात आहोत. या कठिण परिस्थितीमध्ये सर्व गोष्टी लवकरच नियंत्रणात येतील अशी आपण फक्त आशा करू शकतो.’ अशी आशा बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं शुक्रवारी व्यक्त केली होती. त्यानंतर केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यानं टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा होण्याची शक्यता अंधूक झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात