मुंबई, 26 नोव्हेंबर : श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) फॅन्ससाठी 25 नोव्हेंबर 2021 हा दिवस अगदी खास ठरला. श्रेयसनं याच दिवशी न्यूझीलंड विरुद्ध (India vs New Zealand) टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पाचव्या क्रमांकावर बॅटींगला आलेल्या श्रेयसनं पहिल्याच इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं असून पहिल्या दिवसाच्या अखेरीस तो 75 रनवर नाबाद आहे. श्रेयसची ही कामगिरी पाहून त्याचे वडील संतोष अय्यर (Santosh Iyer) खूश झाले आहेत.
श्रेयसनं पहिल्या दिवशी 136 बॉलचा सामना करत नाबाद 75 रन काढले. त्यानं या खेळीत 7 फोर आणि 2 सिक्स देखील लगावले आहेत. श्रेयसच्या वडिलांनी गेल्या 4 वर्षांपासून त्यांच्या व्हॉट्सअप अकांऊटचा फोटो (Whatsapp DP) बदलला नव्हता. हा फोटो न बदलण्याचं कारण देखील तितकंच खास आहे.
संतोष अय्यर यांनी 'मिड-डे' या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, 'टेस्ट क्रिकेट हेच अस्सल क्रिकेट आहे. श्रेयसनं टेस्ट खेळावं असं मला नेहमी वाटत होतं. आज माझं स्वप्न साकार झालं आहे. मी आणि माझी पत्नी आनंदीी आहोत.' श्रेयसच्या वडिलांनी यावेळी त्यांचा व्हॉट्सअप डीपी दाखवला. तसंच तो गेल्या चार वर्षांपासून का बदलला नाही, याचे कारण देखील सांगितले.
श्रेयस अय्यरचा 2017 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या धरमशाला टेस्टच्या टीममध्ये समावेश होता. टीम इंडियानं ती टेस्ट जिंकत मालिका 2-1 नं जिंकली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफी उंचावलेला श्रेयसचा फोटो संतोष अय्यरचा यांचा व्हॉट्सअप डीपी आहे. श्रेयसला त्यावेळी टेस्ट टीमचा सदस्य असला तरी त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला टेस्ट टीममधून वगळण्यात आले.
IND vs NZ: श्रेयसच्या खेळात दिसली मुंबईची खडूस स्टाईल, सुरुवातीपासूनच राखलं न्यूझीलंडवर वर्चस्व
'श्रेयसला त्याचे ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळावी म्हणून मी हा फोटो बदलला नाही. टेस्ट क्रिकेट खेळणे हेच त्याचे ध्येय असले पाहिजे याची आठवण मला त्याला सतत करुन द्यायची होती. हे ध्येय अखेर पूर्ण झालं आहे. त्यामुळे मी खूप आनंदात आहे.' असे संतोष अय्यर यांनी यावेळी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Shreyas iyer, Team india