मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: श्रेयसच्या खेळात दिसली मुंबईची खडूस स्टाईल, सुरुवातीपासूनच राखलं न्यूझीलंडवर वर्चस्व

IND vs NZ: श्रेयसच्या खेळात दिसली मुंबईची खडूस स्टाईल, सुरुवातीपासूनच राखलं न्यूझीलंडवर वर्चस्व

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) गाजवला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) गाजवला.

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) गाजवला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 25 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टचा पहिला दिवस मुंबईकर श्रेयस अय्यरनं (Shreyas Iyer) गाजवला. श्रेयसनं गुरुवारी सकाळीच टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरनं मोठी निराशा केली होती. त्यामुळे श्रेयसकडून टीम मॅनेंजमेंटची मोठी अपेक्षा होती. त्यानं पहिल्या टेस्टमध्ये आश्वासक सुरुवात करत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना दिलासा दिला आहे.

श्रेयस त्याच्या पहिल्या टेस्ट इनिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर बॅटींगला आला. तो बॅटींगला आला तेव्हा टीम इंडियाची स्थिती 3 आऊट 106 अशी होती. लंचपर्यंत चांगला खेळ केल्यानंतर दोन झटपट विकेट गेल्यानं टीम इंडिया बॅकफूटवर गेली होती. मॅचमधील प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम श्रेयसच्या बॅटींगवर झाला नाही. त्यानं टेस्ट क्रिकेटधील पहिला रन आक्रमक पद्धतीनंच काढला.

कसा काढला पहिला रन?

न्यूझीलंडचा स्पिनर एजाज पटेल (Ajaz Patel) यानं श्रेयसला ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल देत मोठा फटका मारण्यासाठी आव्हान दिलं. श्रेयसनं ते आव्हान स्विकारत आक्रमक फटका लगावला. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं मिड ऑफच्या दिशेनं पळत जात तो बॉल पकडण्याचा प्रयत्न केला पण तो तिथपर्यंत पोहचू शकला नाही. विल्यमसननं बॉल अडवून परत फेकेपर्यंत श्रेयसनं 2 रन काढले होते. त्यानंतर त्याच ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर श्रेयसनं टेस्ट कारकिर्दीमधील पहिला चौकार लगावत आपण इथं आक्रमक खेळासाठी आलो आहोत हे दाखवून दिलं.

श्रेयसनं एजाजच्या ओव्हरमध्ये पहिला रन काढल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. त्यानं न्यूझीलंडच्या बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं. अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर रविंद्र जडेजासोबत भक्कम भागिदारी करत टीम इंडियाला दिवस अखेर 4 आऊट 258 असा सन्मानजनक स्कोअर गाठून दिला. पहिल्या दिवसाच्या अखेरीस श्रेयस 75 रनवर नाबाद आहे.

IND vs NZ: श्रेयस-जडेजानं पालटलं चित्र, पहिल्या दिवसावर टीम इंडियाचं वर्चस्व

सूर्यानं लगावला होता सिक्स

मुंबईकर सूर्यकुमार यादवनंही (Suryakumar Yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण दमदार केले होते. इंग्लंड विरुद्ध यावर्षी झालेल्या टी20 मॅचमध्ये सूर्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सूर्या त्याच्या पहिल्या इनिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर बॅटींगला आला होता.  त्यानं देखील जोफ्रा आर्चरला सिक्स लगावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटची झोकात सुरुवात केली होती. सूर्याच्या आधी पृथ्वी शॉने (Pritrhvi Shaw) देखील पहिल्याच टेस्टमध्ये आक्रमक शतक झळकावले होते. आता शुक्रवारी पृथ्वीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी श्रेयसला आहे.

First published:

Tags: Cricket news, Mumbai, Shreyas iyer, Team india