मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: टीम इंडियाला हरवण्यासाठी 2 भारतीयांवर विल्यमसनची भिस्त

IND vs NZ: टीम इंडियाला हरवण्यासाठी 2 भारतीयांवर विल्यमसनची भिस्त

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. या टेस्टमध्ये 2 भारतीयांवर विल्यमसनची भिस्त आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. या टेस्टमध्ये 2 भारतीयांवर विल्यमसनची भिस्त आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. या टेस्टमध्ये 2 भारतीयांवर विल्यमसनची भिस्त आहे.

  • Published by:  News18 Desk

कानपूर, 25 नोव्हेंबर : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final) टीम इंडियाला पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडची टीम पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळण्यासाठी मैदानात उतरली आहे. कानपूरच्या ग्रीन पार्कवर भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पहिली टेस्ट सुरू आहे. टी20 सामन्यांच्या सीरजमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. आता कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाला धक्का देण्यासाठी दोन भारतीयांवर कॅप्टन केन विल्यमसनची (Kane Williamson) भिस्त आहे.

कानपूरच्या स्पिनरना मदत करणाऱ्या पिचवर भारताला धक्का देण्यासाठी 33 वर्षांचा एजाज पटेलचा (Ajaz Patel) प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. एजाज पटेलचा जन्म मुंबईमध्ये झाला, पण तो 8 वर्षांचा असताना कुटुंबासोबत न्यूझीलंडला गेला आणि तिकडेच स्थायिक झाला. सुरुवातीला तो डावखुरा फास्ट बॉलर होता, पण काही काळानंतर त्याने स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली. एजाजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 200 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. किवी टीमकडून तो टेस्ट आणि टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला आहे.

जून महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टआधी मिचेल सॅन्टनरला दुखापत झाल्यानंतर एजाज पटेलला खेळवण्यात आलं. 16 महिन्यांनंतर त्याला टेस्ट खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं. या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 14 ओव्हर टाकून 34 रन देत 2 विकेट घेतल्या, तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्याने 9 ओव्हरमध्ये 25 रन देऊन 2 विकेट्स घेतल्या.

एजाज पटेलप्रमाणेच रचिन रविंद्र (Rachin Ravindra) हा आणखी एक भारतीय या टेस्टमध्ये न्यूझीलंडकडून खेळतोय. विशेष म्हणजे कानपूर टेस्टमध्येच तो टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. रविंद्र चांगली कामगिरी करेल असा विश्वास न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन याने टॉसच्या वेळी व्यक्त केला आहे.

रचिन रविंद्रचा जन्म 18 नोव्हेंबर 1999 साली न्यूझीलंडच्या वेलिंग्टनमध्ये झाला. रचिनचे वडील रवी कृष्णमूर्ती सॉफ्टवेयर सिस्टीम आर्किटेक्ट असून ते बँगलोरचे आहेत. . सचिन तेंडुलकर (Sachine Tendulkar) आणि राहुल द्रविडचे (Rahul Dravid) फॅन असलेल्या रचिनच्या वडिलांनी या भारतीय दिग्गजांच्या नावांची अक्षरे मिसळून आपल्या मुलाचे नाव 'रचिन' ठेवले.

IND vs NZ : द्रविड-रहाणेनं खास मागणी केली का? कानपूरच्या पिच क्यूरेटरनं केला खुलासा

रचिननं याच वर्षी सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्धच्या टी20 सीरिजमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानं त्या सीरिजमधील 5 मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर 5 इनिंगमध्ये 47 रन काढले. त्याचबरोबर टीम इंडियाविरुद्ध जयपूरमध्ये झालेल्या पहिल्या टी20 मध्ये देखील रचिन खेळला होता. ऑलराऊंडर रचिनकडून कानपूर टेस्टमध्ये न्यूझीलंडला मोठ्या आशा आहेत.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india