जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ : द्रविड-रहाणेनं खास मागणी केली का? कानपूरच्या पिच क्यूरेटरनं केला खुलासा

IND vs NZ : द्रविड-रहाणेनं खास मागणी केली का? कानपूरच्या पिच क्यूरेटरनं केला खुलासा

IND vs NZ : द्रविड-रहाणेनं खास मागणी केली का? कानपूरच्या पिच क्यूरेटरनं केला खुलासा

टीम इंडियानं या टेस्टच्या प्लेईंग 11 मध्ये आर. अश्निन (R. Ashwin), रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या तीन स्पिनर्सचा समावेश केला आहे. कानपूरच्या पिचबाबत पिच क्यूरेटरनं मोठा खुलासा केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कानपूर, 25 नोव्हेंबर:  भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टेस्टला (India vs News Zealand 1st Test) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडिअमवर सुरूवात झाली आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियानं या टेस्टच्या प्लेईंग 11 मध्ये आर. अश्निन (R. Ashwin),  रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि अक्षर पटेल (Axar Patel) या तीन स्पिनर्सचा समावेश केला आहे. कानपूरच्या पिचवर या तीन स्पिनर्ससमोर न्यूझीलंडची चांगलीच ‘कसोटी’ लागणार आहे. पिच क्यूरेटरला यापूर्वी पिच बनवण्यासाठी टीम मॅनेजमेंटकडून अनेकदा सूचना मिळाल्या आहेत. कानपूर टेस्टपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कॅप्टन अजिंक्य रहाणेकडून काही सूचना मिळाल्या का? याबाबत कानपूरच्या ग्रीन पार्क पिचचे क्यूरेटर शिव कुमार यांनी खुलासा केला आहे. ‘आम्हाला बीसीसीआयकडून कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. टीम मॅनेजमेंटकडूनही कुणी मला संपर्क केलेला नाही. मला कुणीही स्पिन बॉलर्सना मदत करणारी पिच तयार करण्याची सूचना केलेली नाही. मी एक चांगली पिच तयार केली आहे,’ असे कुमार यांनी सांगितले. कानपूरच्या पिचवर दुसऱ्या दिवसापासून स्पिन बॉलर्सना मदत मिळेल, पण हे पिच लवकर खराब होणार नाही, असं आश्वासन कुमार यांनी दिले आहे. IND vs NZ 1st Test: टीम इंडियानं टॉस जिंकला, पाहा दोन्ही टीमची Playing 11 भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2016 साली देखील या पिचवर टेस्ट मॅच झाली होती. ती टेस्ट संपूर्ण पाच दिवस चालली. त्यानंतर मात्र विदेशी टीमना भारतीय पिचवर खेळणं नेहमीच आव्हानात्मक ठरलं आहे. अनेकदा तर तीन दिवसांमध्येही टेस्टचा निकाल लागलाय. कुमार यांनी याबाबत पिचला दोष देण्यास नकार दिला आहे. टी20 क्रिकेटमुळे बॅटर्सचं स्पिन बॉलर्सना खेळण्याचं तंत्र बदललं आहे, हे देखील याचं एक कारण असल्याचं  त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात