मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs NZ: शुभमन गिल ठरला मुकद्दर का सिकंदर! 2 निर्णयांचा मिळाला मोठा फायदा

IND vs NZ: शुभमन गिल ठरला मुकद्दर का सिकंदर! 2 निर्णयांचा मिळाला मोठा फायदा

कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी शुभमन गिलनं अर्धशतक झळकावले. (फोटो सौजन्य - BCCI)

कानपूर टेस्टच्या पहिल्या दिवशी शुभमन गिलनं अर्धशतक झळकावले. (फोटो सौजन्य - BCCI)

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात कानपूरमध्ये पहिली टेस्ट सुरू आहे. शुभमन गिलचं (Shubman Gill) अर्धशतक हे पहिल्या सेशनच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं. टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या गिलला नशिबानंही चांगली साथ दिली.

  • Published by:  News18 Desk

कानपूर, 25 नोव्हेंबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील पहिल्या टेस्टच्या पहिल्या सेशनमध्ये टीम इंडियानं वर्चस्व गाजवलं आहे. या टेस्टमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलचं अर्धशतक हे पहिल्या सेशनच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं. टीम इंडियात पुनरागमन करणाऱ्या गिलला नशिबानंही चांगली साथ दिली.

कानपूर टेस्टमध्ये शुभमन गिल (Shubman Gill) आणि मयांक अग्रवाल (Mayank Agarwal) ही जोडी टीम इंडियाकडून मैदानात उतरली. इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाची ओपनिंग रोहित आणि राहुल जोडीनं केली होती. यापैकी रोहित शर्माला (Rohit Sharma) या सीरिजमध्ये विश्रांती देण्यात आली आहे. तर केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्यामुळे गिल आणि मयांक ही नवी जोडी ओपनिंगसाठी मैदानात उतरली.गिल-मयांक जोडीला मोठी पार्टनरशिप करता आली नाही. मयांक अग्रवाल 13 रन काढून आऊट झाला. त्याला कायले जेमिसननं (Kyle Jamieson) आऊट केलं.

मयांक आऊट झाल्यानंतर शुभमन गिलची चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सोबत जोडी जमली. सुरुवातीला शांत खेळणाऱ्या गिलनं जम बसल्यानंतर फटकेबाजी करत न्यूझीलंडला बॅकफुटवर ढकललं. गिलनं त्याच्या टेस्ट करिअरमधील चौथं अर्धशतक 81 बॉलमध्ये पूर्ण केलं. यामध्ये त्यानं 1 सिक्स आणि 5 फोर लगावले.

पहिल्या दिवशी लंचसाठी खेळ थांबला तेंव्हा गिल आणि पुजारा इतक्या रनवर खेळत होते. ऑस्ट्रेलियामधील टेस्ट सीरिजमधील ऐतिहासिक विजयात गिलचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याला इंग्लंडमध्ये झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. या दुखापतीनंतर त्यानं पहिल्यांदाच टीम इंडियाकडून गिल खेळत आहे.

IND vs NZ: टीम इंडियाला हरवण्यासाठी 2 भारतीयांवर विल्यमसनची भिस्त

गिल ठरला मुकद्दर का सिकंदर!

शुभमन गिलला पहिल्या दिवशी नशिबाची साथ देखील मिळाली. शुभमन गिल शून्यावर होता तेव्हाच टीम साऊदीच्या बॉलवर त्याला अंपायरनं आऊट दिले. होते. पण, गिलनं तात्काळ DRS घेतला. त्यावेळी बॉल बॅटला लागल्याचे आढळले आणि गिल बचावला. इतकंच नाही तर एजाज पटेलनं टाकलेल्या  7 व्या ओव्हरमध्ये  गिल LBW झाला होता. पण त्यावेळी न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं रिव्ह्यू घेतला नाही. त्याचा फायदाही गिलला मिळाला आणि त्यानं अर्धशतक झळकावले.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india