जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / KBC 13 : ग्रेग चॅपलच्या मुद्यावर सेहवागनं घेतली गांगुलीची फिरकी, अमिताभच्या प्रश्नावर वीरुचे सिक्स! पाहा VIDEO

KBC 13 : ग्रेग चॅपलच्या मुद्यावर सेहवागनं घेतली गांगुलीची फिरकी, अमिताभच्या प्रश्नावर वीरुचे सिक्स! पाहा VIDEO

KBC 13 : ग्रेग चॅपलच्या मुद्यावर सेहवागनं घेतली गांगुलीची फिरकी, अमिताभच्या प्रश्नावर वीरुचे सिक्स! पाहा VIDEO

सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Baega Crorepati) या कार्यक्रमात वीरेंद्र सेहवागनं (Virendra Sehwag) टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीसह (Sourav Ganguly) हजेरी लावली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 सप्टेंबर : टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) हा आक्रमक खेळाबरोबरच मनमोकळ्या शाब्दिक फटकेबाजीसाठीही प्रसिद्ध आहे. सोशल मीडिया असो वा वेगवेगळे कार्यक्रम यामध्ये सेहवागनं त्याच्या या फटकेबाजीनं नेहमीच बहार आणली आहे. सोनी टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Baega Crorepati) या कार्यक्रमात सेहवागनं टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीसह (Sourav Ganguly) हजेरी लावली आहे. ‘कौन बनेगा करोडपती’च्या या कार्यक्रमाचा 13 वा सिझन (KBC 13) आता सुरू झाला आहे. या सिझनमध्ये पहिली सेलिब्रेटी जोडी म्हणून सेहवाग आणि गांगुलीनं हजेरी लावली आहे. सोनी टीव्हीनं या कार्यक्रमाचा प्रोमो  प्रदर्शित केला आहे. या प्रोमोमध्ये सेहवागनं अमितभाच्या प्रश्नांवर सिक्स लगावले आहेत. अमिताभनं यावेळी सेहवागला तू क्रिकेट खेळताना गाणं म्हणायस का? अला प्रश्न विचारला. त्यावर सेहवागनं चला जाता हूँ किसी की धुन में… हे गाणं गाऊन दाखवलं. कॅच सुटल्यावरच्या परिस्थितीमध्ये कोणतं गाणं फिट बसतं असा प्रश्न अमिताभनं सेहवागला विचारल्याचं या प्रोमोत दाखवण्यात आलं आहे. तसंच सेहवागनं यावेळी टीम इंडियाची माजी कोच ग्रेग चॅपल यांच्या मुद्यावर सौरव गांगुलीची गाण्यातून फिरकी घेतली. सेहवागनं हे गाणं ऐकताच गांगुली आणि अमिताभ या दोघांनाही हसू आवरलं नाही. सेहवागनं यावेळी कोणतं गाणं गायलं ते पाहा…

जाहिरात

रिश्ते में तो हम… पाकिस्तान किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच जिंकल्यावर कोणतं गाणं म्हणतोस? असा प्रश्न अमिताभनं सेहवागला विचारला. त्यावर त्यानं अमिताभकडून ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है !… ’ हा डायलॉग अमिताभकडून म्हणून घेतला. त्यानंतर आम्ही त्यांचे बाप आहोत असं उत्तर अमिताभला दिलं. IPL चा फॉरमॅट बदलणार, 2 टीमसाठी 6 शहरं दावेदार! वाचा 5 मोठ्या गोष्टी केबीसीच्या 13 पैकी फक्त तिसऱ्या सिझनचा अपवाद वगळता सर्व सिझनचे सूत्रसंचालन हे अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. तिसऱ्या सिझनमध्ये शाहरुख खान होस्ट होता. सेहवाग आणि गांगुलीचा हा स्पेशल शो 3 सप्टेंबर रोजी दाखवण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात