मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus : रोहित शर्मानं सांगितला मॅचचा टर्निंग पॉईंट, पराभवाबद्दल म्हणाला...

Ind vs Aus : रोहित शर्मानं सांगितला मॅचचा टर्निंग पॉईंट, पराभवाबद्दल म्हणाला...

Ind vs Aus : मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव झाला. या मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्मानं पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Ind vs Aus : मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव झाला. या मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्मानं पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

Ind vs Aus : मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 4 विकेट्सनं पराभव झाला. या मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्मानं पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

मुंबई, 21 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 क्रिकेट मॅचच्या सीरिजमधील पहिली मॅच भारताने 4 विकेट्सनी गमावली. टीम इंडियाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 209 रनांचे विशाल लक्ष्य उभं केलं होतं. मात्र भारतीय बॉलर (Indian Bowlers) या लक्ष्याचा बचाव करू शकले नाहीत. या पराभवानंतर  कॅप्टन रोहित शर्मानं (Rohit Sharma) मॅचचा टर्निंग पॉईंट सांगितला. ‘आज तक’ने याबाबत वृत्त दिलंय. ऑस्ट्रेलियाविद्धची ही सीरिज पुढील महिन्यात होणाऱ्या क्रिकेट टी- 20 वर्ल्डकपच्या (Cricket T20 World Cup) दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. मंगळवारी (20 सप्टेंबर 2022) मोहालीच्या (Mohali) मैदानावर खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये भारतीय टीमने प्रथम बॅटिंग करताना 208 धावा केल्या. पण खराब बॉलिंगमुळे ही मॅच हातातून गेली. कॅमेरून ग्रीनच्या धडाकेबाज खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने ही मॅच सहज जिंकली, आणि सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. हा पराभव रोहित शर्माच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच मॅच संपल्यानंतर रोहित टीममधील बॉलरवर भडकला. यासोबतच टीमची कुठे चूक झाली, आणि मॅचचा टर्निंग पॉइंट काय होता, हेही त्याने सांगितले. टीम इंडियाची बॉलिंग चांगली नसल्याची कबुलीही रोहितने दिली. टीमने चांगला स्कोअर केला, पण बॉलिंग व्यवस्थित झाली नाही, असेही तो म्हणाला. पुढच्या मॅचपूर्वी बॉलिंगवर लक्ष केंद्रित करावं लागेल. जेव्हा मोहालीला आलो, तेव्हा आम्हाला अंदाज होता की, इथे मोठ्या स्कोअरची मॅच होईल, असेही त्याने स्पष्ट केलं. मला वाटत नाही... रोहित शर्मा म्हणाला, ‘मला वाटत नाही की, आम्ही चांगली बॉलिंग केली. 200 रनांचा बचाव करण्यासाठी एक चांगली संधी होती. आम्ही मॅचमध्ये मिळालेल्या अनेक संधींचा फायदा घेतला नाही. टीममधील बॅटर खूप चांगले खेळले. मात्र बॉलर चांगली कामगिरी करू शकले नाहीत. ही अशी गोष्ट आहे, ज्यावर लक्ष देण्याची गरज आहे. नेमकं काय चुकलं, हे समजून घेण्याची चांगली संधी आहे. तुम्ही दररोज 200 धावा करू शकत नाही. यासाठी तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागते. हार्दिकने शानदार बॅटिंग केली. मात्र, पुढच्या मॅचपूर्वी आम्हाला आमच्या बॉलिंगचा आढावा घ्यावा लागेल,’ असेही त्याने स्पष्ट केलं. Ind vs Aus ... आणि भर मैदानात रोहितने दिनेश कार्तिकचा गळा पकडला! Video Viral मॅचचा टर्निंग पॉईंट ‘आम्ही काही प्रमाणात विकेट घेतल्या, पण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आमच्यापेक्षा अधिक चांगले खेळले. मी त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये असतो तर अशा स्कोअरचा यशस्वी पाठलाग करण्याची अपेक्षा ठेवली असती. आम्हाला शेवटच्या 4 ओव्हरमध्ये 60 रनांचा बचाव करता आला असता. पण आम्ही नेमकं तेव्हाच विकेट घेऊ शकलो नाही, आणि हाच मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. या वेळी आणखी एखादी विकेट मिळाली असती, तर निकाल वेगळा असता, असंही रोहित शर्माने सांगितलं. Ind vs Aus: मोहालीतच रोहितनं सांगितली पुढच्या मॅचची टीम, ‘या’ खेळाडूचं कमबॅक पक्कं पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही सीरिज महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, पहिल्याच मॅचमध्ये पराभव झाल्यामुळे हा पराभव रोहितच्या जिव्हारी लागला असून त्याने मॅचनंतर काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या.
First published:

Tags: Cricket news, India vs Australia, Rohit sharma

पुढील बातम्या