मोहाली, 20 सप्टेंबर**:** ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी20 वर्ल्ड कपआधी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रेकेविरुद्ध 3-3 टी20 सामने खेळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कपच्या प्रॅक्टिससाठी भारतीय संघाला पूरेपूर संधी आहे. त्यासाठी प्रत्येक सामन्यात भारतीय संघात वेगवेगळे बदल पाहायला मिळतील. मोहालीतल्या पहिल्या टी20तही रोहितनं संघात काही बदल केले. त्यानं दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतपैकी पंतला विश्रांती देऊन कार्तिकला संधी दिली. पण टॉसवेळी रोहितनं एक महत्वाचं विधानही केलं. बूम बूम बुमराचं कमबॅक होणार मोहालीत ऑस्ट्रेलियन कर्णधारानं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. पण त्याचवेळ टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं पुढच्या सामन्यासाठी आशिया कप खेळू न शकलेल्या जसप्रीत बुमराच्या कमबॅकविषयी सांगितलं. बुमराला पहिल्या मॅचमध्ये विश्रांती देण्यात आली असून तो पुढच्या दोन सामन्यात खेळणार असल्याचं रोहितनं म्हटलं आहे. हेही वाचा - ICC Ranking: भारतीय महिला क्रिकेटरची रँकिंगमध्ये मोठी झेप, टी20त थेट दुसऱ्या स्थानी बुमरा पूर्णपणे फिट आशिया कपआधी जरस्पीत बुमराला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याची आशिया कपसाठीच्या भारतीय संघात निवड झाली नाही. याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला होता. सुपर फोर फेरीतच भारताचं आव्हान संपुष्टात आलं. पण आता बुमरा पूर्णपणे फिट झाला असून आगामी टी20 लढतीत खेळण्यासाठी तो सज्ज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढचे दोन सामने नागपूर आणि हैदराबादमध्ये होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.