जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / Ind vs Aus ... आणि भर मैदानात रोहितने दिनेश कार्तिकचा गळा पकडला! Video Viral

Ind vs Aus ... आणि भर मैदानात रोहितने दिनेश कार्तिकचा गळा पकडला! Video Viral

रोहित शर्मानं भर मैदानात दिनेश कार्तिकचा गळा धरला होता. (Screen Grab)

रोहित शर्मानं भर मैदानात दिनेश कार्तिकचा गळा धरला होता. (Screen Grab)

Ind vs Aus : मोहालीत भारतीय टीमच्या खराब कामगिरीमुळे कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. संतापलेल्या रोहितनं भर मैदानात दिनेश कार्तिकचा गळा धरला.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 21 सप्टेंबर : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 सीरिजमधील पहिली मॅच मंगळवारी मोहालीत झाली. पुढील महिन्यात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपची तयारी म्हणून या मालिकेकडं पाहिलं जात आहे. या मालिकेची सुरूवात टीम इंडियासाठी निराशाजनक झाली. टीम इंडियानं दिलेलं 209 रनचं आव्हान ऑस्ट्रेलियानं 4 विकेट्स राखून पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियानं 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मोहालीत भारतीय टीमच्या खराब कामगिरीमुळे कॅप्टन रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. रोहितच्या संतापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. काय घडले प्रकरण? अक्षर पटेलनी (Axar Patel) अ‍ॅरन फिंचला लवकर बोल्ड करून त्याचा अडसर दूर केला. युझवेंद्र चहलने स्टीव्ह स्मिथला एलबीडब्ल्यू केलं होतं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यावेळी कुणीही रिव्ह्यू घेतला नाही. त्यानंतर मैदानात दाखवलेल्या रिप्लेमध्ये बॉल स्टम्पवर आदळत असल्याचं दिसलं. रोहितनं हे दृश्य पाहिल्यावर तो बॉलर आणि विकेट किपर दिनेश कार्तिकवर चांगलाच नाराज झाला. थोड्या वेळाने उमेश यादवने (Umesh Yadav) ग्लेन मॅक्सवेलला (Glenn Maxwell ) एलबीडब्ल्यू केलं पण त्याबद्दल कार्तिकला खात्री नव्हती. असं असूनही, रोहित DRS घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मॅक्सवेल आऊट झाला. त्यानंतर रोहितने कार्तिकवर कटाक्ष टाकला. युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) ओव्हरनंतर उमेश यादवने त्याच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये स्टीव्ह स्मिथ आणि ग्लेन मॅक्सवेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रोहित शर्माने डीआरएस घेतल्यानंतर त्यामध्ये हे दोघेही बॅट्समन आऊट झाले. दोन्ही वेळा विकेटकीपर दिनेश कार्तिकने आऊटसाठी अपील केले नाही, त्यामुळे रोहित शर्माला राग आला आणि त्याने कार्तिकचा गळा पकडला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    जाहिरात

    टीम इंडियाकडून अक्षर पटेलशिवाय कोणताही बॉलर चांगली बॉलिंग करू शकला नाही. भुवनेश्वर कुमारने चार ओव्हरमध्ये तब्बल 52 रन्स दिलेत. तर, हर्षल पटेलने आपल्या चार ओव्हरमध्ये 49 रन्स दिले. या दोन्ही अनुभवी बॉलर्सना मॅचमध्ये एकही विकेट घेता आली नाही. आशिया कपनंतर टीम इंडियामधील अनेक खेळाडू खराब फॉर्ममध्ये आहेत आणि या खराब फॉर्मची किंमत टीमला मोजावी लागली. Ind vs Aus: टीम इंडियाने केली मोठी चूक, एकमेकांकडे बघत बसले रोहित-विराट-कार्तिक ऑस्ट्रेलियन ऑल-राउंडर कॅमेरॉन ग्रीनने टी-20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पहिल्यांदाच ओपनिंग बॅटिंग केली. या वेळी त्याला क्रीजवर शांत ठेवण्याचे श्रेय त्याने ओपनिंग पार्टनर फिंचला दिलं. ‘मी भारतीय बॅट्समनना खेळताना पाहिलं होतं, त्यामुळे आपल्या डावाला गती कशी द्यायची याची कल्पना आली. हार्दिक पंड्या हा टीममधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. त्याला खेळताना बघून मजा आली,’ असं ग्रीनने मॅच जिंकल्यानंतर सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात