Home /News /sport /

मोठी बातमी : टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा 'या' कारणामुळे रद्द

मोठी बातमी : टीम इंडियाचा न्यूझीलंड दौरा 'या' कारणामुळे रद्द

भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) आगामी न्यूझीलंड दौरा (India tour of New Zealand) पुढील वर्षांपर्यंत स्थगित झाला आहे. आयसीसीच्या (ICC) फ्यूचर टूर प्रोग्रामनुसार टीम इंडिया वर्ल्ड कप सुपर लीग अंतर्गत न्यूझीलंड विरुद्ध तीन सामने खेळणार होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 सप्टेंबर: भारतीय क्रिकेट टीमचा (Team India) आगामी न्यूझीलंड दौरा (India tour of New Zealand) पुढील वर्षांपर्यंत स्थगित झाला आहे. आयसीसीच्या (ICC) फ्यूचर टूर प्रोग्रामनुसार टीम इंडिया वर्ल्ड कप सुपर लीग अंतर्गत न्यूझीलंड विरुद्ध तीन सामने खेळणार होती. पण कोरोना महामारीमुळे हा दौरा रद्द करण्यात आला आहे. आता टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) नंतरच न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या प्रवक्त्यानं देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता  पुढील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपनंतर ही सीरिज खेळली जाईल. न्यूझीलंडची टीम सध्या मर्यादीत ओव्हर्सचे क्रिकेट सामने खेळण्यासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. त्यानंतर ते यूएईमध्ये टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) खेळतील. हा वर्ल्ड कप संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडचे खेळाडू मायदेशी परतणार आहेत. IPL मधील नेट बॉलरची फायनलमध्ये जोरदार फटकेबाजी, टीमला बनवलं CPL चॅम्पियन न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपनंतर दोन टेस्ट आणि तीन वन-डे मॅचच्या सीरिजसाठी भारताचा दौरा करणार आहे. त्यानंतर मायदेशी परतल्यानंतर बांगलादेश विरुद्ध दोन टेस्ट आणि तीन टी20 मॅचची सीरिज खेळेल. त्याचप्रमाणे त्यांची नेदरलँड विरुद्ध तीन वन-डे तसंच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन टेस्ट आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका देखील नियोजित आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Team india

    पुढील बातम्या