• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL मधील नेट बॉलरची फायनलमध्ये जोरदार फटकेबाजी, टीमला बनवलं CPL चॅम्पियन

IPL मधील नेट बॉलरची फायनलमध्ये जोरदार फटकेबाजी, टीमला बनवलं CPL चॅम्पियन

ड्वेन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) सेंट किट्स अ‍ँड नेविस पॅट्रियट्सने (St Kitts and Nevis Patriots) कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 सप्टेंबर : ड्वेन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) सेंट किट्स अ‍ँड नेविस पॅट्रियट्सने (St Kitts and Nevis Patriots) कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL 2021) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. फायनलमध्ये त्यांनी सेंट लुसिया किंग्सचा St. Lucia Kings)  3 विकेट्सनं पराभव केला. शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात डॉमिनिक ड्रेक्स (Dominic Drakes) हा युवा खेळाडू हिरो ठरला. प्रमुख बॅट्समननं निराशा केल्यानंतरही त्यानं हार मानली नाही. ड्रेक्सनं 24 बॉलमध्ये नाबाद 48 रनची दमदार खेळी केली. यामध्ये त्यानं 3 फोर आणि 3 सिक्स लगावले. सेंट किट्सला शेवटच्या 3 ओव्हरमध्ये विजयासाठी 31 रनची गरज होती आणि त्यांच्या पाच महत्त्वाच्या विकेट्स पडल्या होत्या. त्यावेळी डॉमिनिक ड्रेक्स आणि फॅबियन एलन क्रिझवर होते. दोघांनी 18 व्या ओव्हरमध्ये 10 धावा केल्या. त्यानंतर  2 ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज होती. वहाब रियाजने 19 व्या ओव्हरमध्ये 11 धावा दिल्या पण या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर ऐलन (20) आणि पाचव्या चेंडूवर शेल्डन कॉटरेल धावबाद केलं. शेवटच्या ओव्हरमध्ये सेंट किट्सला जिंकण्यासाठी 9 धावांची गरज होती. अत्यंत अतीतटीच्या सामान्यात शेवटच्या चेंडूवर एक रन काढत  ड्रेक्सनं टीमला विजय मिळवून दिला. सीपीएल फायनलचा हिरो ठरलेल्या ड्रेक्सची या आयपीएलमध्ये (IPL 2021) नेट बॉलर म्हणून निवड झाली आहे.  शेल्डन कॉट्रेल, रवी रॉमपॉल आणि फिडेल एडवर्डस या वेस्ट इंडिजच्या प्रमुख बॉलरसह ड्रेक्सची यंदा आयपीएलमध्ये नेट बॉलर म्हणून निवड झाली आहे. 'हिटमॅन'नंतर 'सुपर मॅन' रोहित! बाऊंड्री लाईनवर पकडला भन्नाट कॅच, पाहा VIDEO यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेतील खेळाडू विशेष विमानानं यूएईमध्ये दाखल होतील. त्यानंतर दोन दिवसांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण करुन हे खेळाडू आयपीएलमध्ये खेळू शकणार आहेत. हे सर्व जण एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये जाणार असल्यानं त्यांना केवळ 2 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: