तुम्ही विराट कोहलीवर प्रेम करा किंवा त्याचा द्वेष करा तुम्हाला त्याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारतीय क्रिकेटच्या 80 वर्षांच्या इतिहासात अनेक महान क्रिकेटपटू होऊन गेले. पण त्यापैकी कुणीही विराट कोहलीसारखं नाही. तो एकमेव आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी टेस्ट कॅप्टननं शनिवारी आपले पद सोडण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज (India vs South Africa) गमावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने हा निर्णय जाहीर केला. भारतीय टीमसाठी या सीरिजला फायनल फ्रंटीयरचे महत्त्व होते. यंदा दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज जिंकण्याची सर्वोत्तम संधी टीम इंडियाला होती. बेस्ट ऑफ बेस्ट टेस्ट टीमची कॅप्टनसी करणे हा भारतीय क्रिकेटमधील प्रत्येक दिग्गज खेळाडूसाठी बहुमान आहे. सीएके नायडू हे 1932 साली भारताच्या टेस्ट टीमचे पहिले कॅप्टन होते. लाला अमरनाथ यांच्या कॅप्टनसीमध्ये टीमनं पहिली टेस्ट मॅच जिंकली. मन्सूर अली खान पतौडीच्या (टायगर) नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा विदेशात टेस्ट मॅच आणि सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला. या शतकाच्या सुरूवातीपासून सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) यांनी भारतीय पिचवर टीमला अभेद्य गेले. पण विदेशातील उसळत्या पिचवर भारतीय टीमची तारंबळ उडत असे. यापूर्वीच्या कोणत्याही कॅप्टनला जमलं नाही, ते विराटनं शक्य केलं. त्याने यशाची कमान आणखी उंचावली. विराटने 2015 पासून 68 टेस्टमध्ये टीम इंडियाची कॅप्टनसी केली. यामध्ये विजयाची सरासरी 58. 82 इतकी आहे. तो फक्त ऑस्ट्रेलियाचे महान कॅप्टन स्टीव्ह वॉ (71.92) आणि रिकी पॉन्टिंग (62.22) यांच्या मागे आहे. 25 पेक्षा जास्त टेस्ट मॅचमध्ये नेतृत्त्व करणाऱ्या अन्य कोणत्याही इंटरनॅशनल कॅप्टनच्या विजयाची सरासरी विराटपेक्षा जास्त नाही. विराटच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियाने 40 टेस्ट जिंकल्या 17 गमावल्या तर 11 ड्रॉ केल्या. यामध्ये टीम इंडियाच्या विदेशातील 16 टेस्ट विजयाचा समावेश आहे. कोणत्याही भारतीय कॅप्टनपेक्षा विराटनं विदेशात यशस्वी कामगिरी केली आहे. हे सर्व रेकॉर्ड विराटच्या यशाची गोष्ट सांगण्यासाठी पुरेसे आहेत. पण त्याचवेळी कॅप्टन म्हणून विराटचा यशाचा ध्यास हा त्यापेक्षाही मोठा होता. फक्त रणनीती, गेम प्लॅन हा विराटच्या खेळाचा भाग नव्हता. त्यामध्ये माईंड गेमचाही समावेश होता. सौरव गांगुलीच्या कॅप्टनसीमध्ये हा प्रकार काही प्रमाणात दिसला. विराटने प्रतिस्पर्धी टीमच्या आक्रमकतेला तोडीसतोड उत्तर दिले. विरोधी टीमची वाट पाहण्याच्या आधीच त्याने आक्रमकता दाखवली. विराटने प्रत्येक विकेटनंतर जोरदार सेलिब्रेशन केले. मनातील भावनांचे प्रदर्शन करण्यास त्याने कधीही संकोच केला नाही. विराटने कॅप्टनसी सोडल्यानंतर गांगुलीची पहिली प्रतिक्रिया, कोहलीच्या भविष्याबद्दल म्हणाले... शेवटाची सुरूवात विराट कोहलीनं शनिवारी शेवटचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात टी20 वर्ल्ड कपची तयारी सुरू असताना सप्टेंबर महिन्यातच झाली होती. विराटने तेव्हा टी20 टीमची कॅप्टनसी सोडण्याचा आश्चर्यकारक निर्णय जाहीर केला. त्याने त्यावेळी वर्क लोड हे या निर्णायाचे मुख्य कारण सांगितले. त्याचबरोबर टेस्ट आणि वन-डे टीमचा कॅप्टन म्हणून पुढेही काम करणार असल्याची घोषणा केली. 'मी गेली 8-9 वर्षा तीन्ही प्रकारचे क्रिकेट खेळत आहे. त्यामधील 5-6 वर्ष या सर्व प्रकाराचा नियमित कॅप्टन आहे. त्यामुळे भारतीय टीमला टेस्ट आणि वन-डे क्रिकेटसाठी तयार करण्यासाठी मला आता स्पेस हवा आहे,' अशा अर्थाचे वक्तव्य विराटने केले होते. त्यानंतर काही महिन्यांनी डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) विराटला वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवले. रोहित शर्माची मर्यादीत ओव्हर्सच्या टीमची (वन-डे आणि टी20) कॅप्टन म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीला टी20 कॅप्टनसी सोडू नको अशी सूचना केल्याचा दावा केला. कोहीलीनं तो दावा फेटाळला. इतकंच नाही, तर वन-डे टीमच्या कॅप्टन पदावरून हटवण्याच्या काही तास आधी आपल्याला त्याची माहिती दिल्याचे विराटने सांगितले. पुढचा इतिहास सर्वांना माहिती आहे. टीम टेस्ट सीरिज खेळण्यासाठी गेल्यानंतर हा विषय बंद करण्यात आला. आता या प्रकरणातील शेवटचा अध्याय आपल्याला पाहायला मिळत आहे. विराट कोहलीसह कोणत्याही भारतीय कॅप्टननं विदेशात गमावलेली ही पहिली सीरिज नाही. तसेच ही शेवटची सीरिज देखील नसेल. त्यामुळे दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजमधील पराभवाचा विराटने कॅप्टनपद सोडण्याशी संबंध जोडणे हे खुळचटपणाचे आहे. विराट कोहलीनं 24 तास आधीच दिली होती टीममधील सहकाऱ्यांना कल्पना, वाचा Inside Story हे अनपेक्षित होते? याच लेखकाने दक्षिण आफ्रिका सीरिज सुरू होण्यापूर्वी लिहिलेल्या लेखात विराट कोहली कॅप्टनसी सोडू शकतो असे संकेत दिले होते. सर्वशक्तीमान बीसीसीआयला अंगावर घेतल्यानंतर फार कमी कॅप्टन्सना त्यांची खूर्ची वाचवता आली आहे. विराटने बीसीसीआय तसंच बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कॅप्टन सौरव गांगुली यांना आव्हान दिले होते. त्याचे परिणाम अटळ होते. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सीरिजचा निकाल काहीही लागो, विराट कोहलीला कॅप्टनसी गमावावी लागणार होती. ...म्हणून विराट कोहलीनं कॅप्टनसी सोडली, गावसकरांचा खळबळजनक दावा पुढे काय होणार? विराट कोहलीने भारतीय क्रिकेटमधील सर्वोच्च पद सोडले आहे. तो यानंतरही तीन्ही प्रकारात खेळत राहणार आहे. त्याचा उत्तराधिकारी म्हणून टेस्ट टीमच्या कॅप्टनपदासाठी रोहित शर्माचे नाव आघाडीवर आहे. माजी व्हाईस कॅप्टन अजिंक्य रहाणे खराब फॉर्ममुळे टीममधील जागा गमावण्याची शक्यता आहे. तर, केएल राहुलचे प्लेईंग 11 मधील स्थान अनिश्चित आहे. विराट कोहलीनं सुरू केलेसी विजयी परंपरा रोहित शर्मा पुढे कशी नेणार हे आता सर्वांना समजेल. त्याचवेळी जगभरातील क्रिकेट फॅन्स आक्रमकता आणि सेलिब्रेशनची खास विराट कोहली स्टाईल मिस करणार आहेत. हा खेळ पुढे सुरू राहणार आहे. कॅप्टन कोहलीनं जागा सोडलेली असली तर 'किंग कोहली' अजूनही तिथेच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Rohit sharma, Sourav ganguly, Virat kohli